नंदुरबार : शहरातील निझर रस्त्यावरील हॉटेलचे शटर उचकवून चोरटय़ांनी 48 हजार 500 रुपयांची रोकड लांबविल्याची घटना घडली. उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारंवारच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.निझर रस्त्यावर हॉटेल न्यू कल्याणी पॅलेस आहे. हॉटेल नेहमीप्रमाणे रात्री साडेदहा वाजता बंद झाले. रात्रीच्या वेळी चोरटय़ांनी हॉटेलचे शटर उचकवून आतील गल्ल्यातील 48 हजार 500 रुपये रोख चोरून नेले. सकाळी चोरीची घटना उघडकीस आल्यावर लागलीच उपनगर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी पंचनामा केला. पंकज बन्सीलाल चौधरी यांनी फिर्याद दिल्याने उपनगर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार वाघ करीत आहे.दरम्यान, निझर रस्त्यावर चोरीच्या घटना वाढल्या आहेत. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
निझर जवळील हॉटेलचे शटर उचकवून 48,500 रुपयांची रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 12:13 IST