रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचा बडोद्यात सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:34 IST2021-03-09T04:34:09+5:302021-03-09T04:34:09+5:30
नंदुरबार : रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे नंदुरबार शहरासह जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत बडोदा येथे ‘रोटरी’च्या वार्षिक ...

रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचा बडोद्यात सन्मान
नंदुरबार : रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे नंदुरबार शहरासह जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत बडोदा येथे ‘रोटरी’च्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात रोटरी क्लब ऑफ नंदनगरीला नऊ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
रोटरी डिस्ट्रिक्ट ३०६० च्या वार्षिक पुरस्कार वितरण समारंभात नंदुरबार येथील रोटरी क्लब ऑफ नंदनगरीला २०१९-२० या वर्षाचा ‘बेस्ट क्लब गोल्ड ॲवार्ड’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यासोबतच २०१९-२० या वर्षासाठी विविध आठ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यात पब्लिक इमेज प्लॅटिनम ॲवार्ड, सर्विस प्रोजेक्ट प्लॅटिनम ॲवार्ड, एडल्ट लिटरसी सिल्वर ॲवार्ड, मेंबरशिप सिल्वर चाईल्ड डेव्हलपमेंट ॲवार्ड, इंटरनॅशनल सायटेशन ॲवार्ड, क्लब स्पॉन्सरशिप ॲवार्ड व मेंबरशिप ॲवार्ड या पुरस्कारांचा समावेश आहे.
बडोदा येथे झालेल्या या पारितोषिक वितरण समारंभात रोटरी क्लब ऑफ नंदनगरीला विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून रोटरी इंटरनॅशनल डायरेक्टर कमल सिंघवी, मनोज देसाई, डिस्ट्रिक गव्हर्नर प्रशांत जानी, फर्स्ट लेडी हिता जैन, माजी डिस्ट्रीक गव्हर्नर अनिश शाह, आशिष अजमेरा, डिस्ट्रिक गव्हर्नर नेक्स्ट संतोष प्रधान, डिस्ट्रिक गव्हर्नर इलेक्ट श्रीकांत इंदानी, निहीर दवे आदी उपस्थित होते. रोटरी डिस्ट्रिक्ट ३०६० च्या १०५ क्लबमधून हा पुरस्कार रोटरी क्लब ऑफ नंदनगरी, नंदूरबार या क्लबला देण्यात आला. या पुरस्कार वितरण समारंभात रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे नीलेश तंवर यांना २०१९-२० या वर्षाचा ‘बेस्ट असिस्टंट गव्हर्नर प्लॅटिनम ॲवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले.
या पारितोषिक वितरण समारंभात सदर पुरस्कार हे रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे २०१९-२० चे अध्यक्ष प्रीतिष बांगड, २०२०-२१ चे अध्यक्ष नागसेन पेंढारकर, माजी असिस्टंट गव्हर्नर नीलेश तंवर, सचिव मनोज गायकवाड, सैय्यद इसरार अली आदींनी मान्यवरांच्या हस्ते स्वीकारले.
रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे नंदनगरी फेस्टिवल, मानवता की दिवाली, किताबो से बाते करे, आरोग्य तपासणी शिबिर, पूरग्रस्तांना मदत, स्वेटर वाटप, वृक्षारोपणासह कोरोनाच्या काळात विविध उपक्रम राबविण्यात आले होते. पारितोषिक मिळाल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ नंदनगरी, नंदुरबारचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.