रोटरी क्लबतर्फे शिलाई मशीन वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 12:12 IST2019-09-19T12:12:15+5:302019-09-19T12:12:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप करून महिला सबलीकरणाचे वाखाण्याजोगे कार्य ...

रोटरी क्लबतर्फे शिलाई मशीन वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप करून महिला सबलीकरणाचे वाखाण्याजोगे कार्य केले आहे, असे प्रतिपादन शिवसेनचेचे जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे यांनी केले.
रोटरी क्लब नंदनगरीतर्फे गरजू दहा महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे तर प्रमुख अतिथी म्हणून रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर कमर शेख, नीलेश तवर, उद्योगपती मदनलाल जैन, रोटरी नंदनगरीचे अध्यक्ष प्रितिष बांगड, सचिव नागसेन पेंढारकर आदी उपस्थित होते. पुढे विक्रांत मोरे म्हणाले की, या गरजू महिलांना संसाराचा गाडा हाकण्यासाठी शिलाई मशीनची नक्कीच मदत होईल. रोटरी नंदनगरीने या महिलांना जगण्यासाठी बळ दिले आहे. रोटरी क्लब नंदनगरीचे हे काम अतिशय कौतुकास्पद आहे.
या वेळी असिस्टंट गव्हर्नर कमर शेख व निलेश तवर यांनीही रोटरी क्लबच्या विविध कार्याची माहिती दिली. उद्योगपती मदनलाल जैन यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमा दरम्यान पर्यावरण, स्वच्छता, प्लास्टिक निमरूलनावर शहरातील विविध चौकात जनजागृती करण्यासाठी लावण्यात येणा:या फलकाचे अनावरण डॉ.विक्रांत मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्लबचे अध्यक्ष प्रितिष बांगड यांनी केले. सूत्रसंचालन किरण दाभाडे तर आभार सचिव नागसेन पेंढारकर यांनी मानले.
कार्यक्रमास शब्बीर मेमन, डॉ.विशाल चौधरी, ट्रेझरर जितेंद्र सोनार, युनूस सैयद, नरेश नानकानी, मनीष बाफना, गिरिष जैन, डॉ.अजय शर्मा, हाकीम लोखंडवाला, शीतल पटेल, सॅमूएल लवणे, अड.प्रेमानंद इंद्रजित, दिनेश साळुंखे, संदीप गुरूबक्षाणी, शिल्पा बांगड, राखी तवर, प्रिया बिर्ला, नीता इंद्रजित, जय गुजराथी, प्रा.राहुल मेघे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी आकाश बेदमुथा, विवेक जैन, मुतरुजा वोरा, दीपक सेवानी, विजय मंगलानी यांच्यासह पदाधिका:यांनी परिश्रम घेतले.