घाटेअळी हरभरा पिकाच्या मुळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 13:13 IST2019-12-29T13:13:43+5:302019-12-29T13:13:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रांझणी : वातावरणातील बदलामुळे रांझणी, रोझवासह तळोदा तालुक्यातील अनेक गावांमधील रब्बी हंगामातील हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव ...

घाटेअळी हरभरा पिकाच्या मुळावर
लोकमत न्यूज नेटवर्क
रांझणी : वातावरणातील बदलामुळे रांझणी, रोझवासह तळोदा तालुक्यातील अनेक गावांमधील रब्बी हंगामातील हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पन्नात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदाचा रब्बी हंगामातील पेरणी उशिरा झाल्याने शेतकऱ्यांना पिकाच्या निगराणीसाठी मेहनत घ्यावी लागत आहे.
कृषी विभागाच्या वतीने हरभरा, ज्वारी व मका पिकांवर होणाºया अळ्यांचा प्रादुर्भाव वेळीच रोखण्यासाठी पीक सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पाची मोहीम सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. हरभरा व ज्वारी पिकांवर कामगंध सापळा लावण्याचा प्रयोग राबविला जात आहे.
रब्बी पेरणीही उशिरा शेवटच्या टप्प्यात परतीच्या पावसामुळे रब्बी पेरणीही उशिरा सुरू झाली. निसर्गावर भरवसा ठेवून शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरण्या केल्या. पिकांची वाढ झाली असली तरी अधूनमधून ढगाळ वातावरणामुळे हरभरा, ज्वारी व मका पिकांवर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. काही ठिकाणी हरभरावरील घाटेअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकºयांनी महागड्या औषधींची फवारणी सुरू केली आहे. यंदा रब्बी पिकांच्या वाढीसाठी जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने बºयाच शेतकºयांनी रात्रीचा दिवस करून हरभरा, ज्वारी पिकांच्या वाढीसाठी उपलब्ध पाण्याचा आधार द्यावा लागत आहे. कृषी विभागाचे प्रयोग यंदा पेरणीला उशीर झाल्याने शेतकºयांनी हरभºयाचे क्षेत्र वाढविले आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून बºयाच ठिकाणी घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कृषी विभागाने पीक सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पाची मोहीम सुरू करण्याची मागणी होत आहे.