शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

मांडवा आरोग्य केंद्र पत्र्याच्या खोलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 11:41 AM

पक्क्या इमारतीची प्रतीक्षा : रुग्णांचे हाल, कर्मचा:यांनाही करावा लागतो अडचणींचा सामना

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : शहादा तालुक्यातील कहाटूळ येथील अतीसाराच्या साथीने आरोग्य विभागाचे धिंडवडे निघत असताना आता अक्कलकुवा तालुक्याच्या अती दुर्गम भागातील मांडवा आरोग्य केंद्राच्या उदासिनतेबाबत आरोग्य विभागाची उदासिनता समोर आली आह़े तब्बल 12 गावे आणि 36 पाडय़ांच्या रूग्णांसाठी संजीवनी ठरणारे मांडवा आरोग्य केंद्र पत्र्याची खोली आणि कुडाच्या भिंतींआड सुरु असून पुरेशा सुविधांअभावी रूग्ण हैराण झाले आहेत़ सातपुडय़ाच्या अती दुर्गम भागात नर्मदा काठावरील मांडवी येथे जिल्हा परिषदेने प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती केली होती़ दुर्गम भागातील बामणी, डनेल, डेब्रामाळ, वेलखेडी, सांबर, कंजाला, सुरवाणी, मुखडी, मांडवा या प्रमुख गावातील रूग्ण आणि त्यांना लागून असलेल्या 36 पाडय़ांमधील रूग्णांसाठी महत्त्वपूर्ण ठरणा:या या आरोग्य केंद्राचे कामकाज अत्यंत कमकुवत अशा पत्र्याच्या खोलीतच सुरु आह़े तसेच रूग्णांना दाखल करून घेण्यासाठी याठिकाणी जागा नसल्याने पूर्वी जनावरांचा गोठा म्हणून वापरात असलेल्या कुडाच्या भिंतींआड खोली तयार करण्यात आली आह़े चार उपकेंद्रांचा समावेश असलेल्या या आरोग्य केंद्राची ही दैना माहिती असूनही आरोग्य विभागाकडून कारवाई करण्यात येत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े जिल्हा परिषदेकडून दुर्गम व अती दुर्गम भागातील आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांच्या बांधकामासाठी गेल्या पाच वर्षात कोटय़ावधी रूपये मंजूर करण्यात आले आहेत़ यात काही आरोग्य केंद्रांच्या इमारतींसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर होता़ एवढा निधी मंजूर होत असताना नेमका मांडवा आरोग्य केंद्राबाबत मात्र दुर्लक्ष करण्यात आले आह़े इमारतीसोबत सुविधांचा अभाव असलेल्या या केंद्रात वैद्यकीय अधिकारीही येण्यास अनुत्सुक असल्याचे सांगण्यात येते. प्रशासनाने याठिकाणी इमारत बांधकाम कामासह विविध सुविधांना मंजुरी देण्याची मागणी आह़े या भागात मलेरिया, सिकलसेल यासह इतर गंभीर आजार दिवसेंदिवस डोकेवर काढत असताना आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे येथील रूग्णांच्या समस्या अधिक वाढत आहेत़