मान्सूनपूर्व घरांचा छताची डागडुजी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:38 IST2021-04-30T04:38:59+5:302021-04-30T04:38:59+5:30

प्रकाशा : यंदा पावसाळा हवामान खात्याने लवकर वर्तविला आहे. म्हणून ऐनवेळी धावपळ करण्यापेक्षा आतापासूनच सुज्ञ नागरिकांनी घराच्या ...

Roof repairs of pre-monsoon houses started | मान्सूनपूर्व घरांचा छताची डागडुजी सुरू

मान्सूनपूर्व घरांचा छताची डागडुजी सुरू

प्रकाशा : यंदा पावसाळा हवामान खात्याने लवकर वर्तविला आहे. म्हणून ऐनवेळी धावपळ करण्यापेक्षा आतापासूनच सुज्ञ नागरिकांनी घराच्या छताची डागडुजी सुरू केली आहे.

यंदा मान्सून हवामान खात्याने लवकरच वर्तविला आहे त्यातच कोरोणामुळे लॉकडाऊन सुरू आहे. सकाळी सहा ते सकाळी अकरा वाजेपर्यंत दुकाने उघडे राहतात म्हणून कामासाठी लागणाऱ्या वस्तू वेळेत मिळाव्यात यासाठीदेखील धावपळ करावी लागते.

म्हणून ऐनवेळेला धावपळ करण्यापेक्षा सुज्ञ नागरिकांनी घराच्या छतावरील डागडुजी सुरू केलेली आहे. ज्यांच्या घराच्या छतावरील पत्रे खराब झाले आहेत त्यांच्याकडून पत्रे बदलण्याचे काम सुरू झाले आहे. जुने पत्रे काढून त्या ठिकाणी नवीन पत्रे लावण्यात येत आहेत तर काही ठिकाणी खराब झालेल्या पत्रावर डांबर लावून गळती थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुपारी उन्हाचे चटके लागतात म्हणून हे काम सकाळी सहा वाजेपासून तर दहा वाजेपर्यंत आणि सायंकाळी सहा वाजेनंतरच केले जात आहे. यामुळे काम करताना उन्हाचा विचार केला जात आहे.

तसेच झोपडपट्टी परिसरामध्ये छतावरील कौल लावण्याचे काम सुरू झाले आहे. ज्या ठिकाणी घराचे बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणी कामाला गती दिली जात आहे.

कोरोना आता कमी झाला आहे. त्यामुळे इतर कामांनाही महत्त्व देत घराची डागडुजी केली जात आहे.

प्रकाशा परिसरामध्ये मान्सूनपूर्व घराच्या छतावरील पत्र्याची दुरुस्ती करताना ग्रामस्थ.

Web Title: Roof repairs of pre-monsoon houses started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.