रोलर दरीत कोसळून चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:00 IST2021-02-21T05:00:03+5:302021-02-21T05:00:03+5:30

रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू असतांना अचानक रोलर रस्त्याच्या खाली घसरले. थेट दरीत जाऊन उलटले. त्यात रोलरचे मोठे नुकसान झाले ...

The roller crashed into the valley, killing the driver | रोलर दरीत कोसळून चालक ठार

रोलर दरीत कोसळून चालक ठार

रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू असतांना अचानक रोलर रस्त्याच्या खाली घसरले. थेट दरीत जाऊन उलटले. त्यात रोलरचे मोठे नुकसान झाले आहे. चालकाने रोलरला घसण्यापासून रोखण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला, परंतु त्यात ते यशस्वी झाले नाहीत. याबाबत धडगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

रस्त्याच काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून कोणत्याही वळणावर वाहने पास होत नाही. असे असताना या रस्त्याचे डांबरीकरण चालू झालं. याठिकाणी वाहन चालवण्याास धोकादायक आहे. अनेक वेळा मोटासायकलस्वारांचा अपघात झाले आहेत. सदरील रस्ता लवकर पूर्ण व्हावा व ज्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधायचं आहे तिथ लवकर काम पूर्ण करण्याची गरज आहे. धोकादायक आहे त्याच ठिकाणी रस्ता अर्धवट अवस्थेत पडून असल्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.

Web Title: The roller crashed into the valley, killing the driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.