७७ ग्रामपंचायत हद्दीत रोहयोची कामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 13:21 IST2020-05-17T13:20:30+5:302020-05-17T13:21:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : तालुक्यातील ७७ ग्रामपंचायती अंतर्गत मजुरांना कामे उपलब्ध करून देण्यात आली असून या कामांवर पाच ...

Rohyo works started in 77 gram panchayats | ७७ ग्रामपंचायत हद्दीत रोहयोची कामे सुरू

७७ ग्रामपंचायत हद्दीत रोहयोची कामे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : तालुक्यातील ७७ ग्रामपंचायती अंतर्गत मजुरांना कामे उपलब्ध करून देण्यात आली असून या कामांवर पाच हजार ९२२ मजूर कामावर आहेत. नवागाव ग्रुपग्रामपंचायत अंतर्गत डोकारे येथील साठवण बंधाऱ्यातून गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार शिरीष नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी जि.प. सदस्य अजित नाईक, पं.स. सभापती रतिलाल कोकणी, पं.स. सदस्य दारासिंग गावीत, नवागावच्या सरपंच शर्मिला गावीत, प्रकाश नाईक, निलेश गावीत, प्रभूदास गावीत, भटेसिंग नाईक, महारु गावीत, दिलीप पवार, राम कोकणी, योगेश चौधरी, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, सहायक गटविकास अधिकारी बी.डी. गोसावी, विस्तार अधिकारी किरण गावीत, ग्रामविकास अधिकारी ई.डी. पाटील उपस्थित होते.
तालुक्यात नवागाव, चिंचपाडा, खानापूर, खेकडा, निमदर्डा, चेडापाडा, बोकळझर, कडवान, वºहाडीपाडा, डाळीआंबा व चेडापाडा या गावात गाळ काढण्याची कामे सुरू आहेत. याशिवाय इतर ४१ ग्रामपंचायतींच्या हद्दीतील गाळ काढण्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तालुक्यात एकूण ७७ ग्रामपंचायतीमध्ये कामे सुरू आहेत. त्यात आणखी ग्रामपंचायतींचा समावेश करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. प्रति दिन २३८ रुपये मजूरीच्या दराने व आठ दिवसाच्या आत थेट मजुरांच्या बँक खात्यात त्यांची रक्कम जमा होणार आहे. स्थानिक मजुरांना आपल्या गावातच रोजगार मिळत असल्याने ते समाधानी आहेत. गाळ काढल्याने जलसंधारण होऊन भूगर्भातील पाण्याची पातळी वाढीस मदत होणार आहे. घरकूल, शौचालय, शोषखड्डे, नाडेप, सीसीटी, सिंचन विहीरी व रोपवाटीका आदी ग्रामीण विकासाची कामे होत आहेत.
लोक कामात व्यस्त राहतील त्यामुळे विनाकारण प्रवास करणार नाहीत अशी योजनेची आखणी करण्यात आली आहे. गावोगावी अशी कामे सुरू करण्यासाठी २५ नोडल अधिकाऱ्यांची ग्रामपंचायतनिहाय नेमणूक करण्यात आली आहे. सरपंच, ग्रामसेवक व रोजगार सेवकांशी समन्वय साधून कामे केली जात आहेत. तालुक्यात बाहेरुन आलेल्या सर्व मजुरांना त्यांच्या गावातच रोजगार देण्याचा प्रयत्न होत आहे. ज्याला रोजगार हवा त्यांनी तात्काळ रोजगार मागणी करावी. आठ हजारापेक्षा जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे तालुक्याचे उद्दिष्ट आहे. आज तालुक्यात पाच हजार ९२२ मजूर कामावर असून या संख्येत वाढ होईल, अशी माहिती गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी दिली.

कोरोना महामारीमुळे नंदुरबार जिल्ह्यात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे बेरोजगार मजुरांना तात्काळ काम उपलब्ध करुन देणे आवश्यक होते. त्या अनुषंगाने पालकमंत्री अ‍ॅड.के.सी. पाडवी यांनी जिल्ह्यात एक लाख लोकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्याचाच एक भाग म्हणून नवागाव ग्रुपग्रामपंचायत अंतर्गत डोकारे येथे १९४ मजुरांना व तालुक्यात एकूण पाच हजार ९२२ मजुरांना मनरेगा अंतर्गत रोजगार मिळाला आहे.
-शिरीष नाईक, आमदार, नवापूर

Web Title: Rohyo works started in 77 gram panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.