भुरटय़ा चोरांच्या उपद्रवाने प्रकाशा ग्रामस्थ त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 13:00 IST2019-02-20T12:59:42+5:302019-02-20T13:00:02+5:30
पुष्पदंतेश्वर मंदिरात तिस:यांदा चोरी : शेतक:याच्या ट्रॅक्टरमधून डिङोलही लंपास

भुरटय़ा चोरांच्या उपद्रवाने प्रकाशा ग्रामस्थ त्रस्त
प्रकाशा : भुरटय़ा चोरांचा प्रकाशा येथे सुळसुळाट झाला असून ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. सोमवारी रात्री येथील पुष्पदंतेश्वर मंदिराचे लोखंडाचे दोन दरवाजांचे कुलूप तोडून चोरटय़ांनी गाभा:यातील मोठय़ा आकाराची चांदीची मूर्ती, चार मोठे घंटे, गळती आदी वस्तू चोरुन नेल्या तर एका शेतक:याच्या ट्रॅक्टरमधून 40 लीटर डिङोल चोरीस गेल्याची घटना घडली.
सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा येथील केदारेश्वर मंदिराच्या मागील बाजूस उंचावर पुष्पदंतेश्वर मंदिर आहे. या मंदिरावर याआधीही तीनवेळा इन्व्हर्टर आणि बॅटरी चोरीला गेली आहे. या घटनेला तीन महिने झाले नाही तोच सोमवारी रात्री पुन्हा मंदिराच्या दोन्ही लोखंडी दरवाजांचे कुलूप तोडून गाभा:यातील चांदीची मोठय़ा आकाराची पाच ते सात किलो वजनाची नागाची मूर्ती, लहान-मोठे चार घंटे, तांब्याची गळती आदी वस्तू चोरुन नेल्या. तोडलेले कुलूपही चोरटय़ांनी सोबत नेले. हा प्रकार सकाळी पुजारींच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. मंदिरात चोरी होऊ नये म्हणून गाभा:यात दोन महिन्यापूर्वीच लोखंडी दरवाजा बसविण्यात आला होता.
दुसरी घटनेत चोरटय़ांनी ट्रॅक्टरमधील 40 लीटर डिङोल लंपास केले. गावातील तोताराम महाराज मंदिराजवळील रहिवासी सतीश भगवान चौधरी यांच्या घरासमोर ट्रॅक्टर उभे होते. सकाळी शेतात जावे लागते म्हणून ट्रॅक्टरच्या टाकीत डिङोल फुल भरून ठेवले होते. त्यात 40 लीटरपेक्षा जास्त डिङोल होते. चोरटय़ांनी टाकीची नळी कापून ते चोरुन नेले. ही घटनादेखील त्यांच्याकडे दुस:यांदा घडली आहे. पहिल्या घटनेला महिनादेखील झाला नाही. दीड महिन्यापूर्वी गावातील गुप्तेश्वर मंदिरामागून नवी जीप चोरीची घडना घडली होती. त्या जीपचा अद्यापही तपास लागलेला नाही. गावात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, मंदिर परिसरातही सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यामुळे कसून शोध घेतला तर नक्कीच धागेदोरे हाती लागतील यात शंका नाही.
प्रकाशा गाव व परिसरात भुरटय़ा चोरांनी धुमाकूळ घातला असून वारंवार चोरीच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या पाच वर्षापासून येथे पोलीस कर्मचारी संख्या वाढविण्याची मागणी होत आहे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष घालून येथील दूरक्षेत्रातील पोलीस कर्मचा:यांची संख्या वाढवून रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.