ठेकेदाराच्या मनमानीमुळे रस्त्याचे काम अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:34 IST2021-08-24T04:34:19+5:302021-08-24T04:34:19+5:30
सखोल चौकशी होऊन कारवाई व्हावी मलगाव ते सटीपाणी या रस्त्याच्या अपूर्ण व निकृष्ट कामाची नाशिक विभागीय गुण व नियंत्रण ...

ठेकेदाराच्या मनमानीमुळे रस्त्याचे काम अपूर्ण
सखोल चौकशी होऊन कारवाई व्हावी
मलगाव ते सटीपाणी या रस्त्याच्या अपूर्ण व निकृष्ट कामाची नाशिक विभागीय गुण व नियंत्रण विभागाकडून प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी करावी व ठेकेदार व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी व अपूर्ण काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी परिसरातील आदिवासी बांधवांनी केली आहे.
कोणीही लक्ष द्यायला तयार नाही
या रस्त्याच्या अपूर्ण कामाबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात आहे. या रस्त्यावरून जाणारे लोक मला फोन करतात, तक्रारी करतात. त्यानुसार मी वरिष्ठांकडे तक्रारी करतो; पण कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. त्यामळे आता या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई व्हावी यासाठी आम्ही ग्रामस्थांसह बेमुदत उपोषणाला बसणार आहोत.
-सुभाष पटले, जिल्हा परिषद सदस्य, मलगाव