नाल्याच्या पाण्याने रस्ताच काढला खोदून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 12:56 IST2020-08-31T12:56:31+5:302020-08-31T12:56:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा/कोठार : तळोदा तालुक्यातील आमलाड ते धानोरा दरम्यान असणाऱ्या नाल्याला पूर आल्याने रस्ता खचला आहे. त्यामुळे ...

नाल्याच्या पाण्याने रस्ताच काढला खोदून
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा/कोठार : तळोदा तालुक्यातील आमलाड ते धानोरा दरम्यान असणाऱ्या नाल्याला पूर आल्याने रस्ता खचला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
तालुक्यात मागील काही दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे सातपुड्यात उगम पावणाºया नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे तळोदा तालुक्यातील आमलाड ते धानोरा दरम्यान असणाºया नाल्याला पूर आला. त्यामुळे या नाल्यावरील फरशी पुलालगतचा रस्ता खचला असून, या रस्त्यावरून पाणी वाहत आहे.
यामुळे या रस्त्यावरील वाहतूक अत्यंत धोकेदायक बनली आहे. काटेरी झुडपे टाकून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असली तरी अत्यावश्यक काम असल्यास तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी धानोरा गावातील नागरिक आपला जीव मुठीत धरून व तारेवरची कसरत करीत या खचलेल्या रस्त्यावरून मार्गक्रमण करत आहे. अशा परिस्थितीमुळे मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रस्ता बंद झाल्यामुळे धानोरा, तºहावद येथील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. मागील दोन वर्षांपूर्वी नाल्याला आलेल्या पुरामुळे या फरशीची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली होती. त्यावेळी तात्पुरती डागडुजी करून या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली होती. त्यानंतर मात्र या फरशी पुलाच्या व रस्त्याच्या दुरवस्थेकडे संबंधितांतर्फे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा त्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. आता तरी प्रशासना यातून काही बोध घेऊन या फरशी पुलाच्या दुरूस्ती संदर्भात ठोस भूमिका घेणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत असल्याने संबंधितांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी आहे.
हा रस्ता जिल्हा मार्ग असून, आमलाड, धानोरा मार्गे हा शहादाकडे जातो. सद्य:स्थितीत प्रकाशा ते शहादा दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या दरम्यान ठिकठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे तळोद्याहून शहादाकडे या मार्गावरून प्रवास करणे वाहनधारक टाळत आहेत. बोरदमार्गे शहादकडे जाणाºया रस्त्याचेदेखील कलमाडी ते बोरद दरम्यान काम सुरू असून, तोही प्रवासासाठी योग्य नाही. त्यामुळे आमलाड, धानोरा, खेडले, तºहावद, खरवड, वैजाली, पिंगाणेमार्गे शहादा जाण्यासाठी हा रस्ता सद्य:स्थितीत सर्वांना उपयुक्त ठरत आहे. यामार्गेच शहादा जाणे पसंद करतात. परंतु आता हा रस्तादेखील बंद झाला असून, शहादाकडे जाण्यासाठी वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागणार आहे.