वाटवी ते खांडबारा चौफुली रस्ता ठरतोय धोकेदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:29 IST2021-04-11T04:29:24+5:302021-04-11T04:29:24+5:30

सुरत-नंदुरबार या रस्त्याला जोडून खांडबारा गावाबाहेरील चौफुलीपासून बसथांबा ते वाटवी गावाजवळ मुख्य रस्त्याला जोडला जातो. मात्र बसेस खांडबारा थांब्यावर ...

The road from Vatvi to Khandbara is dangerous | वाटवी ते खांडबारा चौफुली रस्ता ठरतोय धोकेदायक

वाटवी ते खांडबारा चौफुली रस्ता ठरतोय धोकेदायक

सुरत-नंदुरबार या रस्त्याला जोडून खांडबारा गावाबाहेरील चौफुलीपासून बसथांबा ते वाटवी गावाजवळ मुख्य रस्त्याला जोडला जातो. मात्र बसेस खांडबारा थांब्यावर न येता प्रवाशांना चौफुलीवर उतरवले जाते. त्यामुळे वृद्ध, महिला प्रवासी व बालकांचे हाल होतात. याबाबत एस.टी. महामंडळाकडे तक्रार केली असता आधी रस्ता दुरुस्ती करा, त्यानंतर बसेस थांब्यावर येतील, अशी उत्तरे दिली जातात. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे तयार झाले असून, सर्वच वाहनधारकांना कसरत करीत वाहने चालवावी लागतात. खड्डे टाळण्याच्या प्रयत्नात अपघातही होत आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खांडबारा, वाटवी ग्रामपंचायतीने पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांनी पत्रव्यवहार करूनही बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे. बांधकाम विभागाने लक्ष देऊन या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अन्यथा खांडबारा, वाटवीचे ग्रामस्थ आंदोलन करतीत, असा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: The road from Vatvi to Khandbara is dangerous