रस्ता नूतनीकरणानंतर चार महिन्यात लागली ‘वाट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 12:54 IST2019-11-08T12:54:35+5:302019-11-08T12:54:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : अनरदबारी ते सारंगखेडा या 10 किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम दरवर्षी होते. मात्र काही दिवसातच ...

रस्ता नूतनीकरणानंतर चार महिन्यात लागली ‘वाट’
लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : अनरदबारी ते सारंगखेडा या 10 किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम दरवर्षी होते. मात्र काही दिवसातच रस्त्याची दूरवस्था होत असल्याने या कामाची चौकशीची गरज आहे. सद्यस्थितीत रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ांमुळे अपघात होऊन अनेक जण जायबंदी होत आहेत. त्यामुळे या रस्त्याचे काम दज्रेदार होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
शहादा तालुक्यातील अनरदबारी ते सारंगखेडा येथील तापी नदीवरील पुलार्पयतच्या सुमारे 10 किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे गेल्या चार महिन्याअगोदर नूतनीकरण करण्याच्या कामासह साईडपट्टींचेही काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले. परंतु हे काम संबंधित ठेकेदाराने आपल्या मर्जीनुसार नेहमीच्याच पद्धतीने केल्याने रस्त्याची चार महिन्यातच वाट लागली. या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने दररोज लहान-मोठे अपघात घडत असल्याने अनेक जण जखमी झाले आहेत. बुधवारी एका मोटारसायकलस्वाराचा अपघात होऊन पायाला दुखापत झाल्याची घटना घडली. या मार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून संबंधित विभाग मोठय़ा दुर्घटनेची वाट बघत आहे की काय? अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
सारंगखेडा येथे देशात घोडय़ांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असलेली दत्तप्रभूंची यात्रा व चेतक फेस्टिवल भरतो. यंदाही 11 डिसेंबरपासून यात्रेला सुरूवात होणार आहे. त्याआधी या रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. परंतु संबंधित विभाग दुर्लक्ष झाल्याचे दिसते. गेल्यावर्षी साईडपट्टय़ांचे काम करण्यात आल्यानंतर रस्त्याचे नूतनीकरण करण्यात आले. मात्र संबंधित विभागाच्या जबाबदार अधिकारी किंवा कर्मचा:यांच्या उपस्थितीत ठेकेदारांकडून काम करून घेणे गरजेचे असतानाही संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले. ठेकेदाराने त्याच्या मनमानीने निकृष्ट काम केल्याने वर्षभरातच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून दुरवस्था झाल्याचा आरोप वाहनधारक व नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी आहे.
अनरदबारी ते सारंगखेडा येथील तापी नदी पुलार्पयतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या मार्गाच्या रूंदीकरणानंतर करण्यात आलेल्या साईडपट्टय़ांचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने समोरासमोर वाहन आल्यास अपघात घडण्याची शक्यता निर्माण होते. या साईडपट्टय़ा बहुतांश ठिकाणी खोल गेल्या असून वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे साईडपट्टय़ांची नव्याने खोलीकरण करून दुरूस्ती करण्याची अपेक्षा वाहनधारकांकडून व्यक्त केली जात आहे.
4रस्त्यावर हलक्या स्वरूपाचे डांबर मिक्सिंग करुन कार्पेट टाकून चार ते महिन्यापूर्वी रस्ता तयार करण्यात आला. या मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याने ठिकठिकाणी खड्डे तयार झाले आहेत.त्यामुळे या कामासाठी खर्च करण्यात आलेला निधी वाया गेल्याचे बोलले जात आहे.