कलमाडी येथे रस्ता सुरक्षा जीवन कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:11 IST2021-02-05T08:11:13+5:302021-02-05T08:11:13+5:30
यावेळी जि. प. सदस्य धनराज पाटील, शहादा सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता एस. वाय. पगारे, यु.पी. पाटील, कनिष्ठ अभियंता ...

कलमाडी येथे रस्ता सुरक्षा जीवन कार्यशाळा
यावेळी जि. प. सदस्य धनराज पाटील, शहादा सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता एस. वाय. पगारे, यु.पी. पाटील, कनिष्ठ अभियंता नीलेश पाटील, विकास चावरे, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक साबीर शेख, नितीन गवळी, टीम प्रमुख एस. के . पंड्या, उपप्रबंधक अभियांत्रिकी आदित्य रघुवीर राजू, रवींद्र जगताप, दीपक पटेल, कृष्ण मूर्ती, जी. भास्कर, दिनेश वाघ, भगवानदास, जॉनी विक्टर, एन.आर. रेड्डी आदी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य निर्माण कल्याण बोर्ड अंतर्गत राष्ट्रीय राज्यमार्ग व सडक निर्माण विभागाच्या स्वस्तिक इन्फ्रा लॉजिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरक्षा प्रबंधक पवन मिश्रा म्हणाले, अपघात होऊ नये यासाठी वाहनचालकांनी नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. एक अपघात हा दोन कुटुंबांना नेस्तनाबूत करणारा ठरतो. चालकांनी वाहन चालवताना मनावर ताबा ठेवून वाहन चालविणे गरजेचे आहे, असे सांगितले. यावेळी काही कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कलमाडी गावातून रस्ता सुरक्षा जीवन सुरक्षा अभियानांतर्गत रॅलीचे आयोजन केले होते. त्यात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.