सुसरी धरणाच्या पाण्यामुळे रस्ताच गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 13:11 IST2019-11-02T13:11:32+5:302019-11-02T13:11:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील सुसरी धरणातील पाणी गोदीपूर ते नवलपूर रस्त्यावर आल्याने हा ररस्ताच गायब झाला ...

सुसरी धरणाच्या पाण्यामुळे रस्ताच गायब
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील सुसरी धरणातील पाणी गोदीपूर ते नवलपूर रस्त्यावर आल्याने हा ररस्ताच गायब झाला असून शेतक:यांना चार किलोमीटरचा फेरा मारून शेतांमध्ये जावे लागत आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
गोदीपूर ते नवलपूर रस्तालगत सुसरी धरण आहे. या धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाल्यानंतर धरणातील पाणी थेट रस्त्यावर येते. शेतक:यांना चार किलोमीटरचा फेरा मारून जावे लागते. तसेच हा रस्ता धरणालगत असल्याने त्यावर धरणातील पाणी येत असल्याने याठिकाणी संरक्षण भित बांधण्याची मागणी आहे. रस्ता कच्चा असल्याने या मार्गावर ङिारे फुटतात असल्याने रस्ताच गायब होतो. हा रस्ता धरणापासून लांब अंतरावर करण्याची मागणी ब्राम्हणपुरी येथील मुरलीधर पाटील, सखाराम पाटील, रमेश पाटील, मेघराज पाटील, अरुण पाटील यांच्यासह बहुसंख्य शेतक:यांनी केली आहे.
दहा वर्षापासून मागणीकडे दुर्लक्ष
सुसरी धरणाच्या शेजारून शेतात जाण्यासाठी रस्ता होता. परंतु सुसरी धरण बनल्यापासून सुसरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली तर रस्ताच गायब होतो. परिणामी या भागात शेती असलेल्या शेतक:यांना तब्बल चार किलोमीटरचा फेरा मारत शेतात जावे लागते. त्यामुळे हा रस्ता सुसरी धरणापासून लांब करण्याची मागणी गेल्या दहा वर्षापासून होत असून याकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.