बालकांमध्ये ‘एमएसआयसी’चा धोका, जिल्ह्यात मात्र कमी प्रमाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:21 IST2021-06-29T04:21:10+5:302021-06-29T04:21:10+5:30
नंदुरबार : कोरोनातून बरे झालेल्या लहान बालकांना मल्टिसिस्टिम इन्फ्लेमेटरी सिंड्रोमचा (एमएसआयसी) धोका वाढला आहे. सुदैवाने या आजाराचे प्रमाण ...

बालकांमध्ये ‘एमएसआयसी’चा धोका, जिल्ह्यात मात्र कमी प्रमाण
नंदुरबार : कोरोनातून बरे झालेल्या लहान बालकांना मल्टिसिस्टिम इन्फ्लेमेटरी सिंड्रोमचा (एमएसआयसी) धोका वाढला आहे. सुदैवाने या आजाराचे प्रमाण नंदुरबार जिल्ह्यात फारसे नाही. कोरोना झालेल्या प्रत्येक रुग्णाला या आजाराचा धोका असतो. आता मात्र लहान बालकांमध्येही अशी लक्षणे दिसत आहेत.
लहान बालकांना खूप ताप येणे, पाच दिवसांपर्यंत ताप कमी न होणे, डोळे लाल होणे, त्वचेवर रॅशेस पडणे, मळमळ व उलट्या होणे, पोटात सतत दुखणे अशाप्रकारचे त्रास या आजारामुळे होतात. कोरोनातून बरे झालेल्या बालकांमध्ये अशी लक्षणे दिसत असतील, तर तात्काळ बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले आहे.
जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून दुसऱ्या लाटेत अनेक बालकांना कोरोनाची लागण झाली होती. सुदैवाने सर्व बालके ठणठणीत बरी झाली आहेत. त्यातील काही बालकांना आता एमएसआयसी आजाराचा धोका वाढला असून जिल्ह्यात त्याचे प्रमाण फारसे नाही.
मुलांना मास्कशिवाय घराबाहेर पडू देऊ नका. कुठलेही लक्षण आढळल्यास तातडीने डॉक्टरांना दाखवा. कोरोनातून बरे झालेल्या मुलांकडेही लक्ष ठेवा.
कोरोना प्रतिबंधात्मक नियमांबाबत मुलांना जागरूक करा. वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुवायची सवय लावा. स्वच्छतेचे संस्कार करा.
कोरोनातून बरे झालेल्या बालकांची बालरोग तज्ज्ञांकडून वेळोवेळी तपासणी करून घ्या. बालकांना त्रास जाणवत असेल तर दुर्लक्ष करू नका.