इंधन दर वाढल्याने खासगी प्रवासी वाहतूकही महागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:36 IST2021-08-17T04:36:33+5:302021-08-17T04:36:33+5:30

नंदुरबार : कोरोना, इंधनाचे वाढलेेले दर यामुळे खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांनी प्रवासाचे दर २५ ते ३० टक्क्यांनी वाढविले ...

Rising fuel prices have also pushed up private passenger transport | इंधन दर वाढल्याने खासगी प्रवासी वाहतूकही महागली

इंधन दर वाढल्याने खासगी प्रवासी वाहतूकही महागली

नंदुरबार : कोरोना, इंधनाचे वाढलेेले दर यामुळे खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांनी प्रवासाचे दर २५ ते ३० टक्क्यांनी वाढविले आहेत. यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.

दीड वर्षापासून कोरोनामुळे व्यवसाय नाही. कर्ज काढून घेतलेले वाहन घरी उभे करून व्याज व कर्ज भरावे लागत होते. आता कुठे व्यवहाराचा गाडा रुळावर आला असताना इंधनाचे दर भडकले आहेत. त्यामुळे नाइलाजाने वाहनचालकांना प्रवासी भाड्याचे दर वाढवावे लागत आहेत. बस, काळीपिवळी आणि अपेरिक्षा यांची भाडेवाढ काही प्रमाणात करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

गाडीचा हप्ता कसा भरणार?

गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे व्यवसाय ठप्प झाला आहे. वाहन घरी उभे करून दुसरा व्यवसाय करावा लागला आहे. कर्ज काढून घेतलेल्या वाहनाचा हप्ता कसा भरणार, हा प्रश्न आहे. त्यामुळे मोठी कसरत असल्याचे एका वाहनधारकाने सांगितले.

Web Title: Rising fuel prices have also pushed up private passenger transport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.