परीक्षा केंद्रात हुल्लडबाजी करणे पडले महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 12:26 IST2020-03-01T12:26:28+5:302020-03-01T12:26:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : परीक्षा केंद्रात हुल्लडबाजी करत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या १० जणांवर पोलीसांनी कारवाई केली़ नवापुर, ...

Rioting in the examination center was expensive | परीक्षा केंद्रात हुल्लडबाजी करणे पडले महाग

परीक्षा केंद्रात हुल्लडबाजी करणे पडले महाग

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : परीक्षा केंद्रात हुल्लडबाजी करत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या १० जणांवर पोलीसांनी कारवाई केली़ नवापुर, चिंचपाडा, विसरवाडी आणि नंदुरबार शहरात ुशुक्रवारी बारावीच्या परीक्षेदरम्यान ही कारवाई करण्यात आली़
नंदुरबार शहरातील जी़टी़पी महाविद्यालयात बारावीचा पेपर सुरु असताना काही जण निर्धारित १०० मीटर आतमध्ये येऊन गोंधळ करत होते़ यातून दामिनी पथकाने चार जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली़
विसरवाडी येथील सार्वजनिक हायस्कूलच्या परीक्षा केंद्रात परीक्षा सुरु असताना तिघे गोंधळ करत असल्याने पोलीसांनी कारवाई करत विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला़
दरम्यान नवापुर येथील शिवाजी हायस्कूल प्रांगणत १ तर चिंचपाडा ता़ नवापुर येथील वनवासी विद्यालयात गोंधळ करणाºया दोघांवर पोलीसांनी कारवाई करत नवापुर पोलीसात जिल्हाधिकारी यांनी लागून केलेल्या मनाई आदेशांच्या उल्लंघनाचा गुन्हा दाखल केला़ नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या दामिनी पथकाने जीटीपी महाविद्यालय परिसरात कारवाई केली असल्याची माहिती आहे़

Web Title: Rioting in the examination center was expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.