५० किलो गोमांससह रिक्षा जप्त, विसरवाडी पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:23 IST2021-06-06T04:23:09+5:302021-06-06T04:23:09+5:30
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विसरवाडी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, नवापूर येथून विसरवाडीच्या दिशेने रिक्षा विक्रीच्या उद्देशाने गोमांस ...

५० किलो गोमांससह रिक्षा जप्त, विसरवाडी पोलिसांची कारवाई
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विसरवाडी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, नवापूर येथून विसरवाडीच्या दिशेने रिक्षा विक्रीच्या उद्देशाने गोमांस घेऊन येत आहे. या गुप्त माहिती वरून पोलिसांनी धुळे सुरत महामार्गवर विसरवाडी जवळील हार्दिक पेट्रोल पंपाजवळ नाकेबंदी केली.
यावेळी मालवाहू तीन चाकी रिक्षाची (क्रमांक एम एच ४१ सी ६८४९ ) झडती घेतली असता त्यात ५० किलो गोमांस दिसून आले. त्यावरून पोलिसांनी एक लाख ५० हजार रुपये किमतीच्या रिक्षासह एकूण एक लाख ५७ हजार रुपयांचा माल जप्त केला. ही कारवाई विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाने,जमादार दिलीप गावित, प्रदीप वाघ, आकाश वळवी यांच्या पथकाने केली.
विसरवाडी पोलीस ठाण्यात महेंद्र जेरमा वसावे रा. वराडीपाडा ता. नवापूर यास अटक करण्यात आली असून महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास जमादार दिलीप गावित हे करीत आहेत.