शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
2
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
3
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
4
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
5
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
6
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
7
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
8
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
9
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
10
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
11
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
12
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
13
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
14
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
15
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
16
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
17
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
18
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
19
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
20
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...

तळोद्यात दोन महिन्यांपासून रेबीजच्या लसीचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 15:36 IST

तळोदा उपजिल्हा रुग्णालय : सर्वसामान्य रुग्णांना बसतोय आर्थिक भुर्दंड

तळोदा : उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे गेल्या दोन महिन्यांपासून श्वान प्रतिबंधक लसीचा तुटवडा असून पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जायबंदी झालेल्या रुग्णांना नाईलाजास्तव बाहेरून महागड्या लसी घ्याव्या लागत आहेत. रुग्णालय प्रशासनाने लसींची मागणी केलेली असताना अजूनही त्यांना लसी उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. आरोग्य विभागाच्या अशा उदासीन भूमिकेमुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर असून याप्रकरणी तातडीने दखल घेण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.राष्टÑीय आरोग्य अभियानांतर्गत सन २००५ मध्ये येथील कुटीर रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला आहे. साहजिकच या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी असते. परंतु रुग्णालयात पुरेशा आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ प्रशासनाने नेहमीच उदासीन भूमिका घेतल्याचा आरोप आहे. कुठे वैद्यकीय अधिकाऱ्यांची पुरेशा संख्येचा अभाव तर कुठे औषधांची, लसींची वाणवा. त्यामुळे रुग्णांनादेखील पुरेशा वैद्यकीय उपचाराअभावी निराशपणे परत जावे लागते. आताही गेल्या दोन महिन्यांपासून श्वान प्रतिबंधक लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. या लसींअभावी श्वानांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या जखमींना उपचाराशिवाय परत जावे लागत आहे. त्यांना नाईलाजाने बाहेरुन खाजगी डॉक्टरांकडून महागड्या लसी विकत घेऊन उपचार करून घ्यावा लागत आहे. एका लसीची किंमत बाजारात साधारण ४५० ते ५०० रुपये याप्रमाणे तीन-चार लसींचे दोन हजार रुपये मोजावे लागत आहेत. आरोग्य विभागाच्या वरिष्ठ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गरीब रुग्णांना आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यातही पिसाळलेल्या श्वानाने चावा घेतला तर रॅबीज रोगामुळे रुग्णाच्या मेंदूवर त्याचा परिणाम होऊन रुग्णही दगावण्याची शक्यता असते. अशी गंभीर वस्तुस्थिती असताना संबंधितांनी लसी उपलब्ध करून देण्याबाबत नकारात्मक भूमिका घेतली आहे. वास्तविक येथील रुग्णालयाच्या प्रशासनाने श्वान प्रतिबंधक रॅबीज लसींची मागणी गेल्या दोन महिन्यांपूर्वीच मुंबई येथील शासनाची हॅपकीनसन इन्स्टिट्यूट या कंपनीत केली आहे. साधारण २५० ते ३०० लसींची मागणी केली आहे. या उपरांतही त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. तथापि लसी शिल्लक नसल्याचे मोघम उत्तर त्यांना मिळत आहे. एवढेच नव्हे तर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडेही लसींची मागणी केल्याचे सांगण्यात आले. परंतु त्यांनीही लसी उपलब्ध नसल्याचे उत्तर संबंधितांना दिले. इकडे शहरात श्वानांनी मोठा उच्छाद मांडला आहे. त्यातही पिसाळलेल्या कुत्र्यांची संख्या अधिक वाढल्यामुळे त्यांनी लहान बालके, वृद्धांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे रोजच असे रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात लस घेण्यासाठी दाखल होत आहेत. परंतु येथे लसी नसल्याने उपचार न घेताच परतावे लागत आहे. वास्तविक तळोदा शहर साधारण ५० हजार लोकवस्तीचे शहर आहे. शहराची लोकसंख्या लक्षात घेऊन उपजिल्हा रुग्णालयही तेवढ्याच सोयी-सुविधांनी, औषधोपचाराने सुसज्ज असणे आवश्यक आहे. मात्र याकडे आरोग्य विभागाने साफ दुर्लक्ष केले आहे. याउलट पाच ते सात हजार लोकसंख्या असलेल्या गावांमधील प्राथमिक आरोग्य केंद्रांतमध्ये रॅबीजच्या लसींचा मुबलक पुरवठा करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींनीही याकडे दुर्लक्ष केल्याने जनतेने नाराजी व्यक्त केली आहे. आरोग्य विभागाच्या वरिष्ठ प्रशासनाने गंभीर दखल घेऊन तातडीने लसी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.