सव्र्हर डाऊनमुळे परवानगीसाठी फिरफिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 12:35 IST2019-09-28T12:35:13+5:302019-09-28T12:35:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवासाठी गरबा मंडळांनी पोलीस ठाण्याकडून ऑनलाईन परवानगी घेण्याची सूचना संबंधित गरबा मंडळांना दिली ...

सव्र्हर डाऊनमुळे परवानगीसाठी फिरफिर
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवासाठी गरबा मंडळांनी पोलीस ठाण्याकडून ऑनलाईन परवानगी घेण्याची सूचना संबंधित गरबा मंडळांना दिली असली तरी सव्र्हर डाऊनमुळे त्यात खोळंबा येत आहे. परवानगीसाठी सातत्याने मंडळाच्या पदाधिका:यांना पोलीस ठाण्याकडे फिरफिर करावी लागत असल्याची व्यथा त्यांनी बोलून दाखविली आहे.
नवरात्रोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपल्याने व जिल्हा पोलीस प्रशासनाने परवानगी करीता ऑफ लाईन अर्ज स्विकारण्याची सूचना संबंधीत पोलीस ठाण्यांना द्यावी, अशी गरबा मंडळांची मागणी आहे.
संपूर्ण खान्देशात प्रसिद्ध असलेल्या नवरात्रोत्सवास 29 सप्टेंबर रोजी घटस्थापनेपासून होत आहे. साहजिकच या निमित्ताने गरबा, रास दांडियाचीदेखील तरूण-तरूणींमध्ये लगबग सुरू झालेली आहे. यासाठी वाजंत्रीची आवश्यकता भासत असल्यामुळे पोलीस ठाण्यांची गरबा मंडळाने अधिकृत परवानगी घेण्याची सूचना पदाधिका:यांना केली आहे. गणेशोत्सवात पोलीस ठाण्यांनी गणेश मंडळांना ऑनलाईन परवानगीची सक्ती केली होती. याच धर्तीवर गरबा मंडळांनीही ऑफलाईन परवानगीचा अर्ज न करता ऑनलाईन परवानगी घेण्याची सूचना केली आहे.
तळोदा पोलीस ठाण्यानेही मंडळांना ऑनलाईन परवानगी घेण्याचे सूचित केले आहे. तथापि या ऑनलाईन नोंदणीत सातत्याने सर्वर डाऊनने खोळंबा घातला आहे. कारण जेव्हा गरबा मंडळाचे पदाधिकारी संबंधित संगणक केंद्रात ऑनलाईन नोंदणीसाठी जातात तेव्हा सव्र्हर डाऊन असल्याचे सांगितले जाते. तास न तास पदाधिका:यांना केंद्रावर ताटकळत उभे राहावे लागत असते. एवढे करूनही नोंदणी होत नसल्याचे पदाधिकारी सांगतात.
मंडळाच्या नोंदणीसाठी गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सतत संगणक केंद्राकडे हेलपाटे मारीत असल्याची व्यथा काही महिला पदाधिका:यांनी बोलून दाखविली आहे. वास्तविक नवरात्रोत्सवात अबाल वृद्धांबरोबरच तरूण-तरूणींमध्ये मोठे आकर्षण असते. साहजिकच उत्सवासाठी शौकीन दांडीया प्रेमी 15 दिवसांपासून तयारी करीत असतात. शिवाय सुरत, इंदोर, अहमदाबाद येथून स्पेशल दांडीयाचा ड्रेसदेखील आणून ठेवला आहे, अशी परिस्थिती असतांना ऑनलाईन परवानगीची सक्ती पोलीस ठाण्यांनी घातल्याने तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. विशेष म्हणजे हा उत्सव अगदी दोन दिवसांवर येवून ठेपला आहे. असे असतांना अजूनही गरबा मंडळांना पोलीस ठाण्याचे परवानगी मिळालेली नाही. परिणामी गरबा प्रेमींमध्ये निराशा पसरली आहे. ऑनलाईन नोंदणीचा परिणाम गरबा मंडळाच्या संख्यांवरही होणार असून, जिल्हा पोलीस प्रशासनाने याप्रकरणी गंभीर दखल घेऊन ऑनलाईन नोंदणीची अट शिथिल करून ऑनलाईन अर्जाने परवानगी स्विकारावी, अशी गरबा प्रेमी व पदाधिका:यांची अपेक्षा आहे. दरम्यान, ऑनलाईन नोंदणीबाबत येथील पोलीस ठाण्यामध्ये संबंधीतास विचारले असता ऑनलाईन नोंदणीची सूचना वरिष्ठांकडूनच देण्यात आली आहे. त्यामुळे मंडळांनी ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. आता पावेतो शहरातून दोनच गरबा मंडळांची ऑनलाईन नोंदणी झाल्याचे सूत्रांनी सांगितले.