दिशाच्या बैठकीत योजनांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 12:33 PM2020-10-28T12:33:30+5:302020-10-28T12:33:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्या (दिशा) बैठकीत केंद्र पुरस्कृत विविध योजनांचा आढावा घेण्यात ...

Review of plans at direction meeting | दिशाच्या बैठकीत योजनांचा आढावा

दिशाच्या बैठकीत योजनांचा आढावा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्या (दिशा) बैठकीत केंद्र पुरस्कृत विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. खासदार डॉ.हिना गावीत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक घेण्यात आली. अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी संवेदनशिलतेने काम करावे असे यावेळी खासदार डॉ.गावीत यांनी सांगितले.
बैठकीस आमदार डॉ.विजयकुमार गावीत, शिरीषकुमार नाईक, राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, समितीचे अशासकीय सदस्य कांतीलाल टाटीया, बबीताताई नाईक, डॉ.स्वप्नील बैसाणे, प्रदीप वळवी आदी उपस्थित होते. बैठकीतस बोलताना खासदार डॉ.गावीत यांनी सांगितले की,  जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाणी देता येणे शक्य आहे. पहिल्या टप्प्यात तयार केलेल्या आराखड्यानुसार त्वरीत कामे पूर्ण करावी. ग्रामपंचायत स्तरावर माहिती घेऊन  इतर गावांचा सविस्तर आराखडा तयार करावा. त्यात सर्व पाड्यांचा समावेश होईल असे सांगितले.  तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थीस दुबार लाभ देण्या जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कडक कारवाई करावी. शहरी भागातील बेघर व्यक्तींना घरकूल देण्यासाठी जागेचा शोध घ्यावा. स्वच्छ भारत मिशन टप्पा-२ अंतर्गत सर्वेक्षण बिनचूक होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे त्वरीत करण्यात यावी. कामे वेळेवर न करणाऱ्या कंत्राटदारांवर आवश्यक कारवाई करावी. मेढाने वीजजोडणी दिलेल्या प्रत्येक घराची पाहणी करून अहवाल सादर करावा, असे निर्देशही खासदार डाॅ. हीना गावीत यांनी दिले. बैठकीत डॉ. कांतीलाल टाटीया यांनी लिहिलेल्या ‘पेसाचा वसा’ या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तिकेत पेसा कायद्याविषयी सोप्या भाषेत माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान बैठकीत वीज कंपनीने मेढा योजनेंतर्गत वाटप केलेल्या सोलर बॅटरी व दिव्यांबाबत जोरदार चर्चा रंगली होती. यात दुर्गम भागात बॅटरींचा स्फोट घडल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर करण्यात आल्या. 
 

Web Title: Review of plans at direction meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.