‘माझी वसुंधरा’ अभियान कामांचा आढाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 11:34 IST2020-12-18T11:33:59+5:302020-12-18T11:34:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा :   ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत येथे वृक्षलागवड व गाव स्वच्छतेसाठी शपथ देण्यात आली. जि.प.चे मुख्य ...

Review of 'My Earth' campaign | ‘माझी वसुंधरा’ अभियान कामांचा आढाव

‘माझी वसुंधरा’ अभियान कामांचा आढाव

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा :   ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत येथे वृक्षलागवड व गाव स्वच्छतेसाठी शपथ देण्यात आली. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी भेट देऊन कामांचा आढावा घेतला.
           ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत येथे विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्या कामांचा आढावा जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे यांनी घेतला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, जि.प.चे माजी सदस्य रामचंद्र पाटील, सरपंच सुदाम ठाकरे, उपसरपंच भरत पाटील, जि.प. सदस्या भारतीबाई भिल, पंचायत समिती सदस्य जंग्या भिल, ग्रामविकास अधिकारी बी.जी. पाटील, तलाठी डी.एम. चौधरी, ग्रामपंचायत सदस्य अरुण भिल, महेंद्र भोई, दिलीप पाटील, नंदकिशोर पाटील, भावडू ठाकरे, गणेश पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. प्रारंभी केदारेश्वर मंदिर व बॅरेजलगत वृक्षारोपण करून ज्याठिकाणी वृक्षलागवड केली आहे तेथे गावडे यांनी पाहणी केली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. तसेच ‘माझी वसुंधरा’ अभियानाची शपथ देण्यात आली. रामचंद्र पाटील म्हणाले की, या अभियानात जर फंड मिळाला तर आम्हाला काम करताना अडचणी येणार नाहीत. तसेच अंगणवाड्यांना संरक्षक भिंतीची गरज आहे. जेणेकरून लावलेले वृक्ष आम्हाला जगवता येतील. 
          उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ म्हणाल्या की, ज्यांचे शौचालय बांधायचे राहिले असतील त्यांनी लागलीच दोन दिवसांत     प्रस्ताव पाठवा, आपण मंजूर करून    देऊ, ज्यांना नळकनेक्शन हवे असेल, शाळा, अंगणवाड्या, वैयक्तिक यांनाही पाणी परवानगी लवकर देण्यात येईल. ‘माझी वसुंधरा’ अभियानात सर्वांनी सहभाग नोंदवून गावाच्या विकासासाठी मदत करावी, असे आवाहन केले.
            मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे म्हणाले की, वृक्षलागवड केल्यानंतर त्याच्या संवर्धनासाठी अडचणी येतात. परंतु लोकांच्या सहभागातून आपण ते काम पूर्ण केले पाहिजे. गावाच्या सहभागातून हे अभियान यशस्वी करावे. पृथ्वी, जल, आकाश, अग्नी, वायू या सर्व गोष्टींचा विचार करून प्रकाशा ग्रामपंचायतीने अद्यापपर्यंत चांगले गुण मिळवले आहेत. अजून थोडी मेहनत घेण्याची गरज आहे. असे झाल्यास गावाला बक्षीस मिळू शकते, असे     त्यांनी सांगितले. प्रास्ताविक  ग्रामविकास अधिकारी बी. जी. पाटील यांनी तर सूत्रसंचालन नरेंद्र गुरव यांनी केले.

Web Title: Review of 'My Earth' campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.