शहाद्यात मनरेगा कामांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 12:41 IST2020-05-29T12:41:39+5:302020-05-29T12:41:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कापूस खरेदी प्रक्रियेला वेग देऊन दररोज १०० वाहनातील कापसाची खरेदी होईल असे नियोजन करावे, ...

शहाद्यात मनरेगा कामांचा आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : कापूस खरेदी प्रक्रियेला वेग देऊन दररोज १०० वाहनातील कापसाची खरेदी होईल असे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले. त्यानंतर शहादा येथे झालेल्या बैठकीत मनरेगाच्या कामांचा आढावा घेतला.
शहादा येथील कापूस खरेदी केंद्र आणि कॉटन मीलला जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी गुरुवारी भेट दिली. त्यांच्यासोबत उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, पोलीस उपअधीक्षक पुंडलिक सपकाळे, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी दयानंद जगताप, तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, गटविकास अधिकारी सी.टी. गोसावी आदी होते.
जिल्हाधिकारी डॉ.भारुड म्हणाले, शेतकऱ्यांकडील शिल्लक कापसाचे सर्वेक्षण करण्यात यावे. शेवटच्या शेतकºयाचा कापूस खरेदी होईपर्यंत ही प्रक्रीया सुरू ठेवावी. योग्य नियोजन करून खरेदी प्रक्रीयेला वेग देण्यात यावा. जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन आडत व्यापाºयांशी चर्चा केली. शहादा येथे झालेल्या बैठकीत मनरेगा योजनेचा आढावा घेतला. शेतकºयांचे ग्रुप करून कंपार्टमेंन्ट बंडींगची कामे घेण्यात यावी. सीसीटीची कामे घेताना सोबत वृक्षारोपणाची कामे घेण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले. प्रकाशा व तलावडी येथे ग्रामसेवक, सरपंच व सदस्य यांच्या समन्वयाने मजुरांना काम उपलब्ध करून दिल्याने बैठकीत त्यांनी कौतुक केले. मानमोडे आणि भुलाणे येथील कामांना डॉ.भारुड यांनी भेट दिली. त्यांच्या हस्ते मजुरांना टोप्यांचे वाटप करण्यात आले. स्थानिक प्रशासनाने या टोप्या उपलब्ध करून दिल्या आहेत. या वेळी वनक्षेत्रपाल अनिल पवार, गटविकास अधिकारी गोसावी, वनपाल एस.एस. देसले, वनपाल प्रवीण वाघ, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच शांताराम खर्डे, मलगाव येथील सरपंच शांताराम पावरा उपस्थित होते. त्यांनी स्वयंसेवी संघटनांच्या प्रतिनिधींशीदेखील चर्चा केली. कोविड संकटानंतर शासनाच्या विविध योजनांमध्ये स्वयंसेवकांचे चांगले सहकार्य घेता येईल. संकट आणखी काही काळ चालणार असल्याने स्वयंसेवकांनी उत्साह कायम ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. डॉ.भारुड यांनी नगरपालिकेलाही भेट देऊन पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा आढावा घेतला.