आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडीत यांची अंगणवाडीला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 12:16 IST2019-07-29T12:16:38+5:302019-07-29T12:16:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा दौ:यावर आलेल्या आदिवासी आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडीत यांनी पातोंडा ता़ नंदुरबार येथील ...

आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडीत यांची अंगणवाडीला भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा दौ:यावर आलेल्या आदिवासी आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडीत यांनी पातोंडा ता़ नंदुरबार येथील अंगणवाडी क्रमांक एकला भेट दिली होती़ दरम्यान याठिकाणी भोंगळ कारभार पाहून त्यांनी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना केल्या़
सोमवारी सकाळी विवेक पंडीत यांनी पातोंडा येथील अंगणवाडी केंद्रात भेट दिल्यावर या ठिकाणी एकही तीव्र कुपोषित मुल नसल्याचे सांगण्यात आले समितीचे अध्यक्ष पंडीत यांना सांगण्यात आले होत़े यावेळी त्यांनी रजिस्टरची तपासणी केली असता, तशी नोंदही आढळून आली़ परंतू रजिस्टरमधील नोंदी आणि मुलांची अवस्था पाहून त्यांनी एका बालकाची तपासणी केली़ यात बालकाचे वजन कमी आढळून ते तीव्र कुपोषित असल्याचे सिद्ध झाल़े रजिस्टरमध्ये त्याची नोंद कुपोषित बालक करण्यात आली होती. व त्याला कुपोषित बालकाची ट्रीटमेंट दिली जात होती. तसेच अंगणवाडीतील मुलांची पटसंख्या व त्यांना दिला जाणारा आहार व इतर आकडेवारी जशीच्या तशी कॉपी पेस्ट केलेली आढळली.
यावेळी विवेक पंडित यांनी अंगणवाडी सेविकेला चुकीची आकडेवारी लिहिल्याबद्दल धारेवर धरले. तसेच बालकविकास प्रकल्प अधिकारी यांना अंगणवाडीचा पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. आढावा समितीच्या नंदुरबार दौ:यात शहरालगतच्या पहिल्याच अंगणवाडीच्या पाहणीत समोर आलेली परिस्थिती बघता ग्रामीण भागात काय परिस्थिती असेल याबाबत आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडीत यांनी चिंता व्यक्त केली़ अंगणवाडी आणि किचनसाठी जागा उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना अंगणवाडीसाठी किचन बांधून देण्याचे आवाहन केल़े तसेच किचनसाठी पहिला निधीही दिला त्यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत व्यवस्थापन समितीने दोन महिन्यात कीचन बांधून देण्याचे आश्वासन समिती अध्यक्ष पंडित याना दिले.