सेवापट मंजुरीसाठी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आंदोलन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:36 IST2021-09-04T04:36:31+5:302021-09-04T04:36:31+5:30

सेवापटातील त्रुटी व आक्षेप यांची परिपूर्ण नोंद न घेतल्याने त्रुटींची पूर्तता मुदतीत करून सेवापट मंजुरीसाठी सादर केले जात नाहीत. ...

Retired police officers will agitate for the approval of the service card | सेवापट मंजुरीसाठी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आंदोलन करणार

सेवापट मंजुरीसाठी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आंदोलन करणार

सेवापटातील त्रुटी व आक्षेप यांची परिपूर्ण नोंद न घेतल्याने त्रुटींची पूर्तता मुदतीत करून सेवापट मंजुरीसाठी सादर केले जात नाहीत. त्यामुळे काही पोलीस अधिकारी व अंमलदारांची सेवापट मंजुरीसाठी पाठविले नसल्याने तेही प्रलंबित आहेत. यासंदर्भात वेळोवेळी संबंधित प्रशासनाला निवेदन देऊनदेखील न्याय मिळत नसल्याने कोविड महामारी संपल्यानंतर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार कल्याणकारी सेवाभावी संघटनेने बैठकीत घेतला आहे.

नंदुरबार येथे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी सेवाभावी संघटनेची बैठक नुकतीच घेण्यात आली. या बैठकीला संघटनेचे संचालक व सभासद उपस्थित होते. या बैठकीत सर्व विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. बऱ्याच सेवापटमध्ये सुव्यवस्थित नोंदी व नियमाने वेतनवाढ न करता चुकीची वेतनवाढ लावल्याने पोलीस कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यावर त्यांच्या सेवापटात कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे नियमाने निश्चिती नोंदी न केल्याने कर्मचाऱ्यांची अतिप्रदानाची रक्कम वसूल करण्यात येत आहे. तसेच बरेच सेवापट हे निवृत्तीवेतन व लाभाची रक्कम वेळेवर मिळावी, यासाठी नियमाने सेवापट हे मुदतीत संबंधित कार्यालयाकडे सादर केले जात नाही. काही पोलीस अधिकारी व अंमलदार त्यांचे सेवापट मंजुरीसाठी पाठविले नसून ते अद्याप प्रलंबित असल्याचा मुद्दा बैठकीत मांडण्यात येऊन चर्चा करण्यात आली. तीन टप्प्६यांमधील लाभाचे वेतन श्रेणीतील जे कर्मचारी प्राप्त आहेत, त्यांना अद्याप लागू झालेली नाही. यासंदर्भात संबंधित प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन प्रत्यक्षात अडचणी मांडूनदेखील त्या सोडविण्यात आल्या नाहीत. म्हणून प्रलंबित मागण्यांसंदर्भात न्याय मिळावा, यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचे बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले.

Web Title: Retired police officers will agitate for the approval of the service card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.