सेवानिवृत्त जमादार गुन्ह्यांची कागदपत्रे घेवून परागंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 12:36 IST2019-11-08T12:36:04+5:302019-11-08T12:36:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत जमादाराने त्यांच्याकडे असलेल्या सहा गुन्ह्यांचा तपास न करता ते कागदपत्र ...

Retired Jamadar collecting documents of crime and polluting | सेवानिवृत्त जमादार गुन्ह्यांची कागदपत्रे घेवून परागंदा

सेवानिवृत्त जमादार गुन्ह्यांची कागदपत्रे घेवून परागंदा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत जमादाराने त्यांच्याकडे असलेल्या सहा गुन्ह्यांचा तपास न करता ते कागदपत्र स्वत:कडे ठेवले. सेवानिवृत्तीनंतरही गुन्ह्यांची कागदपत्रे पोलीस ठाण्यात सादर न केल्याने अखेर त्यांच्यावर पोलिसांनीच गुन्हा दाखल केल्याचा प्रकार नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात घडला.  
सरदारसिंग रजेसिंग सोनवणे, रा.संभाजीनगर, शहादा असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस जमादाराचे नाव आहे. सरदारसिंग सोनवणे हे डिसेंबर 2018 पासून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात सहायक पोलीस उपनिरिक्षक अर्थात जमादार म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांच्याकडे मारहाण, अपघात, चोरी, अवैध दारू, अगिA उपद्रव यासह इतर दहा दखलपात्र गुन्ह्यांचा तपास होता. परंतु या गुन्ह्यांचा तपास त्यांनी केला नाही. शिवाय वरिष्ठांच्या आदेशाची अवज्ञा केली. याच काळात ते सेवानिवृत्त देखील झाले. परंतु सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी या गुन्ह्यांचे कागदपत्र किंवा तपासासंदर्भातील प्रगती त्यांनी वरिष्ठांकडे सुपदरू केली नाही. निरिक्षक राजेश शिंगटे यांनी कर्मचा:यामार्फत त्यांच्याशी संपर्कही साधला. परंतु उपयोग झाला नाही. त्यामुळे अखेर निरिक्षक राजेश शिंगटे यांनी फिर्याद दाखल केली. त्यावरून सरदारसिंग सोनवणे यांच्या विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला.
 

Web Title: Retired Jamadar collecting documents of crime and polluting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.