साने गुरुजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:20 IST2021-06-22T04:20:59+5:302021-06-22T04:20:59+5:30

पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा प्रथम वर्षाचा ९८ टक्के निकाल लागला असून, फिटर व्यवसायात ...

Results of Sane Guruji Industrial Training Institute announced | साने गुरुजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा निकाल जाहीर

साने गुरुजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा निकाल जाहीर

पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा प्रथम वर्षाचा ९८ टक्के निकाल लागला असून, फिटर व्यवसायात प्रथम वर्षात कल्पेश किशोर अलकरी ८५.८० टक्के गुण मिळवून प्रथम, तर प्रदीप जगन कोळी ८५.२० टक्के मिळवून द्वितीय, वीजतंत्री प्रथम वर्षात दुर्गेश बागूल ९०.४० टक्के गुण मिळवून प्रथम तर केतन बोरसे ९० टक्के गुण मिळवून द्वितीय तसेच कोपा या व्यवसायात सुरेंद्र चौधरी ८६.५० टक्के गुण मिळवून प्रथम, तर हुसेन मोहम्मद ८६.५० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला.

द्वितीय वर्षाचा ८५ टक्के निकाल लागला असून फिटर व्यवसायात विशाल वानखेडे ८३.११ टक्के गुण मिळवून प्रथम, तर नीलेश कोळी ८२ टक्के मिळवून द्वितीय, वीजतंत्रीत सतीश बोराडे ९१.५६ टक्के गुण मिळवून प्रथम, तर नीलेश पवार ९० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला. उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींचे संस्थेचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव कमल पाटील, सामान्य प्रशासन व शैक्षणिक समन्वयक प्रा.मकरंद पाटील, अर्थ व बांधकाम समन्वयक पी.आर. पाटील, प्राचार्य डॉ.डी.एम. पटेल यांनी कौतुक केले.

Web Title: Results of Sane Guruji Industrial Training Institute announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.