तापीकाठावरील गावांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 12:13 IST2019-07-23T12:12:38+5:302019-07-23T12:13:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा तालुक्यातील गावांना प्रतिबंधात्मक ...

तापीकाठावरील गावांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा तालुक्यातील गावांना प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक यावर कारवाई करणा:या अधिकारी व शासकीय पथकांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. या पाश्र्वभुमीवर हे आदेश लागू करण्यात आले आहेत. आदेशानुसार जिल्ह्यातील तापी काठालगतच्या शहादा तालुक्यातील बामखेडा, टेंभे बु., देऊर/कमखेडा, सारंगखेडा, कौठळ तसा, कु:हावद तसा, ससदे, बिलाडी तसा, बामखेडा तसा, नांदरखेडा, शेल्टी व पळासवाडा. नंदुरबार तालुक्यातील सावळदा, बोराळे, सुजालपूर, नाशिंदे, आराळे, ओसर्ली, अमळथे व कोपर्ली. नवापूर तालुक्यातील बोकळझर व नवागांव या गावांच्या हद्दीतील स्टेशनच्या प्रभारी अधिका:यांना प्रतिबंधात्क आदेश अंमलात आणण्यासाठी आदेशित करण्यात आले आहे.
महसूल अधिकारी/कर्मचारी यांची भरारी व स्थायी पथकांची नियुक्ती करण्यात येते. पथकाकडून कार्यवाही करताना वाहतूकदार यांच्याकडून महसूली अधिकारी, कर्मचारी यांना अटकाव करून गंभीररित्या मारहाण केल्याचे प्रकार घडले आहेत. अशा घटनांमुळे जिल्ह्यात सार्वजनिक उपद्रव व सुव्यवस्थेचा प्रश्न वेळोवेळी निर्माण होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तापी नदी पात्रासह जिल्ह्यातील इतर ठिकाणी जेथे वाळू आहेत तेथे अवैधरित्या वाहतूक करणारे ट्रॅक्टर, ट्रक, हायवा, डंपर, जेसीबी, पोकलॅण्ड व तत्सम सर्व वाहने वाहनचालक कंत्राटदार व मजूर कामगार यांना प्रतिबंध करण्यासाठी सदर आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.