जिर्णोद्धार झालेले मंदीर जमिनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 12:50 IST2020-10-11T12:49:55+5:302020-10-11T12:50:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : दोन महिन्यांपूर्वीच जिर्णोद्धार केलेल्या मंदीराला भरधाव ट्रकने धडक दिल्याने मंदिराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. ...

Restored temple landlord | जिर्णोद्धार झालेले मंदीर जमिनदोस्त

जिर्णोद्धार झालेले मंदीर जमिनदोस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : दोन महिन्यांपूर्वीच जिर्णोद्धार केलेल्या मंदीराला भरधाव ट्रकने धडक दिल्याने मंदिराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या अपघातात ट्रकचा पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे तर चालक जखमी झाला आहे.
बºहणपूर-अंकलेश्वर महमार्गावर लांबोळा गावात शुक्रवारी रात्री ही घटना घडली. पोलीस सूत्रांनुसार, शुक्रवारी रात्री शहादाकडून तळोदाकडे जाणाऱ्या भरधाव सोळा चाकी ट्रॉलाने (क्रमांक जीजे ३ बीडब्ल्यू २७७७) काही वाहनचालकांना कट मारला होता. ते वाहनचालक आपला पाठलाग करीत असल्याचा संशय आल्याने ट्रक चालकाने भरधाव ट्रक चालविण्याचा प्रयत्न केला. लांबोळा गावाजवळ आल्यावर चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रकने सरळ रस्त्यालगत असलेल्या मंदीराला धडक दिली. त्यात मंदीराचे मोठे नुकसान झाले आहे. दररोज सायंकाळी मंदीर परिसरात ग्रामस्थ तेथे ठेवलेल्या बाकांवर बसत असतात.
अपघात घडला त्यावेळी सुदैवाने कुणीही नव्हते. मंदीराचा नुकताच जिर्णोद्धार करण्यात आला आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी घरोघरी जाऊन वर्गणी देखील गोळा केली आहे. आकर्षक असलेल्या या मंदीराचा एक भाग पुर्ण जमिनदोस्त झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
अपघातात ट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे. ट्रकचालक देखील या अपघातात किरकोळ जखमी झाला आहे. दरम्यान रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे या भागात वारंवार अपघात होत आहेत. याबाबत शहादा पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

संरक्षक जाळी उभारावी..
कोळदा ते खेतिया या रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. बºयाच ठिकाणी काम रखडले आहे. रस्ता काम करतांना गाव व वस्ती असलेल्या ठिकाणी संरक्षक भिंत किंवा इतर अडथळे असणे आवश्यक असतांना तसे काहीही करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे मोठी समस्या निर्माण होते. यामुळे मोठा अपघातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Restored temple landlord

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.