शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
4
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
5
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
6
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
7
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
8
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
9
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
10
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
11
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
12
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
13
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
14
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
15
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
16
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
17
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
18
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
19
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
20
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
Daily Top 2Weekly Top 5

कृषी तंत्रज्ञान महोत्सवास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 15:17 IST

कृषी विज्ञान केंद्र : शेतक:यांनी अवगत केली आधुनिक माहिती, कृषीतज्ज्ञांकडून मार्गदर्शन

नंदुरबार : डॉ.हेडगेवार सेवा समितीच्या नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्रात सुरु झालेल्या 13 व्या कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी प्रदीप लाटे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी डॉ.हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष कृष्णदास पाटील होते. या वेळी कृषी विकास अधिकारी लाटे म्हणाले की, नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्राने सुरु केलेली ‘कृषी तंत्रज्ञान महोत्सवाची’ संकल्पना आता संपूर्ण देशातील कृषी विज्ञान केंद्रांमध्ये राबवली जात आहे. ही अत्यंत अभिमानास्पद बाब असल्याचे ते म्हणाले. कृष्णदास पाटील यांनी जमिनीची उत्पादकता वाढविणे आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतक-यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केले.आधुनिक डॉ.हेडगेवार सेवा समितीच्या नंदुरबार येथील तंत्रज्ञानाच्या प्रचार-प्रसारासाठी विविध पर्याय असून डॉ.हेडगेवार सेवा समितीच्या नंदुरबार येथील तंत्रज्ञान महोत्सवाची उपयुक्तता जास्त आहे. यात शेतकरी, युवक, शेतकरी महिला तसेच बचतगट या सर्व घटकांसाठी विविध प्रकारचे तंत्रज्ञान जवळून पाहण्याची संधी उपलब्ध होत असल्याचे कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख राजेंद्र दहातोंडे यांनी प्रास्ताविकात सांगितले. सध्याच्या काळात शेतीची कामे वेळेत पूर्ण करणे गरजेचे असल्याने शेतक:यांचा कल यांत्रिकीकरणाकडे वाढतो आहे. हे लक्षात घेवून नंदुरबार जिल्ह्यासाठी आवश्यक असलेल्या पीक अवशेषांच्या व्यवस्थापनासाठीच्या यंत्राची उपयुक्तता विषय विशेषज्ञ जयंत उत्तरवार यांनी मांडली. ट्रॅक्टरचलित यंत्रांचे उच्च दर्जाचे उत्पादन करणा:या शक्तीमान कंपनीचे उपव्यवस्थापक पराग बडगुजर यांनी कापसाच्या प:हाटीचे तुकडे करणारे कॉटन स्टॉक श्रेडर उसाच्या पाचटाचे तुकडे करून पसरविणारे यंत्र, रोटाव्हेटर आणि नांगर यांचे एकत्रितपणे कार्य करणारे पॉवरहॅरो, ट्रॅक्टरचलित फवारणीयंत्र, खड्डे खोदण्यासाठी उपयुक्त पोस्टहोल डिगर या यंत्राची तांत्रिक माहिती आणि वापरण्याची पद्धत याविषयी माहिती दिली. कंपनीचे विभागीय विपणन अधिकारी प्रशांत केवट यांनी यंत्रासाठी शासनाच्या योजनांविषयी शेतक-यांना माहिती दिली. जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी जमिनीतील सेंद्रीय पदार्थ, सेंद्रीयकर्ब यांचे महत्त्व कृषी विज्ञान केंद्राचे  विषय विशेषज्ञ आर.एम. पाटील यांनी विषद केले. सेंद्रीय कर्ब वाढविण्यासाठी पिकांच्या वाया जाणारे अवशेष पुन्हा जमिनीत टाकणे गरजेचे असल्याचे सांगून त्यासाठीच्या गांडूळखत, सेंद्रीयखत आदी पद्धतीची माहिती दिली.  सूत्रसंचालन जयंत उत्तरवार यांनी केले. कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्राचे आर.एम. पाटील, पी.सी. कुंदे, यु.डी. पाटील, डॉ.महेश गणापुरे, आर.आर. भावसार, व्ही.एस. बागल, गीता कदम, विजय बागल, राहुल नवले, रजेसिंग राजपूत, किरण मराठे, कल्याण पाटील, कैलास सोनवणे यांनी सहकार्य केले.