साकलीउमर येथे लसीकरणाला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:23 IST2021-05-29T04:23:31+5:302021-05-29T04:23:31+5:30
सातपुड्यातील दुर्गम भागात नागरिकांमध्ये कोरोना लसीबाबत अफवा पसरल्या होत्या. त्यामुळे तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, युनिसेफ तालुका समन्वयक, ...

साकलीउमर येथे लसीकरणाला प्रतिसाद
सातपुड्यातील दुर्गम भागात नागरिकांमध्ये कोरोना लसीबाबत अफवा पसरल्या होत्या. त्यामुळे तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, युनिसेफ तालुका समन्वयक, पंचायत समितीचे माजी सभापती, वेली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, जि.प. शाळा केंद्रप्रमुख, शिक्षक, माध्यमिक शिक्षक, बालविकास प्रकल्प विभाग, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्ती, सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी यांनी संयुक्त मोहीम राबवून जनजागृती केली. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून साकलीउमर येथील शिबिरात २९२ नागरिकांनी लस घेतली.
या वेळी तहसीलदार रामजी राठोड, गटविकास अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्निल मालखेडे, पं.स.चे माजी सभापती बिजा बावा वसावे, पं.स. सदस्य भगतसिंग पाडवी, सरपंच उषाबाई दिलीप पाडवी, उपसरपंच, युनिसेफ तालुका समन्वयक जितेंद्र वळवी, ग्रामसेवक अशोक पावरा, केंद्रप्रमुख कैलास सूर्यवंशी, बालविकास प्रकल्प अधिकारी राहुल मौलवे, मोलगी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज निळे, वेली आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.भीमसिंग पाडवी, डॉ.एस.एन. पिंपरे, तलाठी जयवंत पाडवी, गुलाब पाडवी, अनुप्रिया पाडवी, अंगणवाडी पर्यवेक्षिका खर्डे, आरोग्य कर्मचारी, युनिसेफ प्रतिनिधी जयसिंग वसावे, प्रदीप पाडवी, जयंतीलाल ब्राह्मणे, ग्रामपंचायत कर्मचारी, जि.प. शाळा व माध्यमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्ती यांनी शिबिरासाठी परिश्रम घेतले.