समशेरपूर कारखान्याच्या स्मार्ट शुगर योजनेला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 11:49 IST2019-12-12T11:49:29+5:302019-12-12T11:49:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील समशेरपूर येथील अयान साखर कारखान्याने ऊस दरात वाढ करत शेतकऱ्यांना २ हजार ३७५ ...

Response to the Smart Sugar Scheme of the Samasherpur factory | समशेरपूर कारखान्याच्या स्मार्ट शुगर योजनेला प्रतिसाद

समशेरपूर कारखान्याच्या स्मार्ट शुगर योजनेला प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील समशेरपूर येथील अयान साखर कारखान्याने ऊस दरात वाढ करत शेतकऱ्यांना २ हजार ३७५ रुपये मेट्रीक टनाप्रमाणे दर देणार असल्याचे घोषित केले आहे़ या कारखान्याने यंदाच्या वर्षात स्मार्ट शुगर योजनेंतर्गत स्वयंचलित वजन काटा व इतर तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे़
कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आऱसी़बडगुजर यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा अतीवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतकºयांच्या ऊसाचे नुकसान झाले होते़ या पार्श्वभूमीवर कारखान्याने यापूर्वी शेतकºयांच्या ऊसाला २ हजार ३४५ रुपये प्रती मेट्रीक टन दर दिले होते़ यातून शेतकºयांची भरपाई होणार नसल्याने कारखान्याने ऊसाच्या दरात वाढ करुन ते २ हजार ३७५ रुपये मेट्रीक टन केले आहे़ कारखान्यात ऊस देणाºया शेतकºयांचे पैसे जास्तीत जास्त १० दिवसात देणार असल्याचे कळवण्यात आले आहे़
या निर्णयाचे शेतकºयांनी स्वागत केले असून नोव्हेंबर महिन्यात ऊस देणाºया शेतकºयांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यात आल्याची माहिती समशेरपूर कारखाना प्रशासनाने दिली आहे़ यंदा समशेरपूर साखर कारखान्यात ऊस देणाºया शेतकºयांच्या बांधावर स्मार्ट शुगर योजनेंतर्गत अत्याधुनिक स्वयंचलित वजन काटा सुरु करण्यात आल्याचे बडगुजर यांनी सांगितले़

Web Title: Response to the Smart Sugar Scheme of the Samasherpur factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.