मंदिर समर्पण निधी संकलनास खेतिया परिसरातून प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:12 IST2021-02-05T08:12:01+5:302021-02-05T08:12:01+5:30
अयोध्या येथे श्रीराम मंदिराचे निर्माण होत असून या मंदिरासाठी देशभरातून समर्पण निधी संकलन अभियान चालविण्यात येत आहे. त्यात खेतिया ...

मंदिर समर्पण निधी संकलनास खेतिया परिसरातून प्रतिसाद
अयोध्या येथे श्रीराम मंदिराचे निर्माण होत असून या मंदिरासाठी देशभरातून समर्पण निधी संकलन अभियान चालविण्यात येत आहे. त्यात खेतिया येथेही १५ जानेवारीपासून समर्पण निधी संकलन सुरू करण्यात आले. मंदिराचे पत्रक घराघरात पोहोचवून निधी संकलन केले जात आहे. यामध्ये विविध संघटनांचे कार्यकर्ते व राम सेवक या अभियानात जोडले गेले आहेत. या समर्पण निधी संकलनात शहरातील सर्वच स्तरातील नागरिक सहयोग करीत आहे. श्रीराम मंदिर समर्पण निधी संकलन अभियानाचे संयोजक पवन शर्मा, धर्म जागरण प्रचारकचे प्रमुख राजेंद्र ठाकूर, बडवानी जिल्हा सरसंघचालक राजेंद्र जगताप, अभियानाचे जिल्हा संयोजक अजय गुप्ता, गोविंद चौधरी, दिलीप शर्मा, कपिल शाह, महेश पवार, गिरधर सूर्यवंशी, मनोज बोहरा, उपनगराध्यक्ष प्रदीप निकुम, सचिन चौहान, छोटूलाल सोनी, सुनील चौधरी, कमलेश राजपूत, योगेश हरसोला, हरिओम चौधरी, कमलेश जैन, संदीप पाटील, समाधान माळी, विनोद सोनवणे, विशाल परदेशी, प्रकाश महाले, आशिष संचेती, सुनील सोनी यांच्यासह रामसेवक या अभियानात सहभाग नोंदवून निधी संकलन करून कार्य करीत आहेत.