महिलांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:34 IST2021-03-09T04:34:27+5:302021-03-09T04:34:27+5:30

नंदुरबार जागतिक महिलादिनी शाळेतील सर्व शिक्षिकांचा सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी राजश्री गायकवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून सीमा मोडक ...

Respect for women | महिलांचा सन्मान

महिलांचा सन्मान

नंदुरबार जागतिक महिलादिनी शाळेतील सर्व शिक्षिकांचा सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी राजश्री गायकवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून सीमा मोडक उपस्थित होत्या. या वेळी व्यासपीठावर सुनीता बागुल, दीपाली भदाणे, शीतल जोशी, कमल चौरे, धनगौरी पाडवी, कविता भंडारी व उपमुख्याध्यापक एन.के. भदाणे, पर्यवेक्षक पंकज पाठक, पर्यवेक्षक श्रीराम मोडक, डी.झेड. चौधरी उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. या वेळी चेतन पाटील, स्मित बोरसे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. सीमा मोडक यांनी आईबद्दल असलेले आपले प्रेम व कर्तृत्ववान स्त्री फक्त नोकरी, उद्योग सांभाळणारी असते असे नाही तर सर्वसामान्य स्त्री सुद्धा कर्तृत्ववान असते, असे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा राजश्री गायकवाड यांनी महिला दिनाचा इतिहास सांगून जागतिक महिला दिन वेगवेगळ्या देशात कशाप्रकारे साजरा केला जातो या बद्दल माहिती दिली. प्रास्ताविक स्वप्नील अहिरे यांनी केले. सूत्रसंचालन बी.एड. कॉलेजचे मनोज कोकणी तर आभार कुणाल वळवी यांनी मानले. कार्यक्रमासाठी बी.एड. कॉलेजचे आंतरवासीता शिक्षक-शिक्षिका, शीतल वाघ, कविता वसईकर, राजकुमार पटले, शांताराम मालचे, वंदना सोनवणे, हेमंत खैरणार व दिनेश वाडेकर यांनी परिश्रम घेतले.

अँग्लो उर्दू अध्यापक विद्यालय, नंदुरबार

नंदुरबार येथील अँग्लो ऊर्दू अध्यापक विद्यालयात जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला. प्राचार्य मेहमूद खाटीक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रा.तरन्नूम शेख होत्या. कार्यक्रमासाठी छात्राध्यापिका रूबिना शेख, आयेशा खाटीक, तहुरा मणियार, जिनिरा खान, नाजमीन शेख, आस्मा मणियार, ईकरा मेमन, फातेमा शेख, तब्बसुम मणियार, मुनिरा मणियार, जररीन इनामदार, ईकरा मिर्झा, मदिहा सैय्यद, अशना पिंजारी, फातेमा शेख, मारीया खाटीक, आस्मा शेख यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन छात्राध्यापिका आयेशा खाटीक तर आभार प्रा.निशात शेख यांनी मानले.

वरिष्ठ महाविद्यालय, अक्कलकुवा

अक्कलकुवा येथील आर.एफ.एन.एस वरिष्ठ विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत आंतरराष्ट्रीय महिला दिवस ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला. क.ब.चौ.उ.म.वि. जळगांव राष्ट्रीय सेवा योजना विभाग परिपत्रकानुसार हा कार्यक्रम घेण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालय पंढरपूर, जिल्हा सोलापूरच्या सहायक प्रा.सविता शिवाजी दूधभाते या लाभल्या. प्रा.दूधभाते यांनी अत्यंत उत्कृष्ट प्रकारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी रा.से.यो. एककाचे कार्यक्रम अधिकारी, विद्यार्थी, जिल्हा समन्वयक डॉ.माधव कदम व डॉ.बी.एस.पाटील यांच्या मार्गदर्शनात, तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. भरत एन. पाटील यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.विनोद राघोजी जोगदंड, विद्यार्थी शिक्षक आणि कर्मचारी यांच्यासह ३० जणांनी ऑनलाइन पद्धतीने सहभाग नोंदवला. विद्यापीठाच्या सूचनेचे पालन करून डॉ.जुबेर शेख, डॉ.योगेश दूसिंग, डॉ.विजय पाटील, डॉ.मनोज मुधोळकर, प्रा.अंकुश खोब्रागडे, प्रा.विनिश चंद्रन, प्रा.गोटू सूर्यवंशी व कर्मचारी, नारायण पाटील, भरत साळवे, जगदीश पटेल, अंकुश ठाकरे, यांनी उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवला.

Web Title: Respect for women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.