मिशन हायस्कूलमध्ये गुणवंतांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 11:44 IST2020-03-02T11:44:45+5:302020-03-02T11:44:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विद्यार्थ्यांमधील कला-गुणांना वाव देण्यासाठी एस. ए. मिशन पूर्व प्राथमिक शाळेतर्फे विविध क्षेत्रात चांगली कामगिरी ...

Respect for Quality at Mission High School | मिशन हायस्कूलमध्ये गुणवंतांचा सत्कार

मिशन हायस्कूलमध्ये गुणवंतांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विद्यार्थ्यांमधील कला-गुणांना वाव देण्यासाठी एस. ए. मिशन पूर्व प्राथमिक शाळेतर्फे विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात संस्थाध्यक्ष रेव्ह.जे. एच.पठारे, कार्यकारी संचालक डॉ. राजेश वळवी, मार्था सुतार, मुख्याध्यापिका नुतनवर्षा वळवी, मुख्याध्यापक संदेश यंगड, मुख्याध्यापिका सुषमा कालू, डॉ. सुनिता अहिरे व पर्यवेक्षक सबस्टीन जयकर आदी उपस्थित होते. या प्रसंगी संस्थेचे चेअमन रेव्ह. पठारे यांनी संस्थेचा इतिहास मांडत या शाळेचे माजी विद्यार्थी कोणत्या पदावर आहेत त्याची माहिती दिली. तर डॉ. राजेश वळवी यांनी मुलांना हस्ता-खेळता शिक्षण देण्याचे आवाहन केले. तसेच डॉ. सुनिता अहिरे यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन संगीता रघुवंशी यांनी केले. आभार मनीषा पौल यांनी मानले. त्यात स्वरा देशमुख, मिनाक्षी गिरी यांच्यासह अनेकांचा सामवेश होता.

Web Title: Respect for Quality at Mission High School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.