प्रा.मकरंद पाटील यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:05 IST2021-09-02T05:05:55+5:302021-09-02T05:05:55+5:30

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मुख्य अभिष्टचिंतन कार्यक्रम सोहळा झाला. अध्यक्षस्थानी सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील होते. यावेळी ...

Respect to Prof. Makrand Patil | प्रा.मकरंद पाटील यांचा सत्कार

प्रा.मकरंद पाटील यांचा सत्कार

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मुख्य अभिष्टचिंतन कार्यक्रम सोहळा झाला. अध्यक्षस्थानी सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन राजाराम पाटील, पूज्य सानेगुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश पाटील, उपनगराध्यक्षा रेखाबाई चौधरी, माजी नगराध्यक्ष विजय पाटील, माजी उपनगराध्यक्ष अरविंद कुवर, माजी नगरसेवक के.डी. पाटील, सुपडू खेडकर यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, जयप्रकाश पाटील, विजय पाटील, विनोद पाटील, उद्योगपती नुह नुराणी, माजी नगराध्यक्ष प्रकाश जैन, रमेश जैन, युनूस बागवान उपस्थित होते.

प्रा.मकरंद पाटील व माधवी पाटील यांचा विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सत्कार केला. भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, जिल्हा उपाध्यक्षा कल्पना पंड्या, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा किन्नरी सोनार, मंदाण्याचे उपसरपंच अनिल भामरे, पं.स. सभापती बायजाबाई भिल, रवींद्र पाटील, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, मुख्याधिकारी राहुल वाघ, आमदार राजेश पाडवी, आमदार सुधीर तांबे, प्रदीप ठाकरे, हरीश पाटील आदींनी शुभेच्छा दिल्या.

वाढदिवसानिमित्त विविध संघटनांच्या वतीने कोरोना योद्धा सन्मान, वृक्षारोपण आदी कार्यक्रम घेण्यात आले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.विजयप्रकाश शर्मा यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रा.मकरंद पाटील साहेब युवामंचचे रमाशंकर माळी, गणेश पाटील, कार्तिक नाईक, शरद पाटील, विलास पाटील, जयेश पाटील, आकाश पाटील, सागर मराठे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Respect to Prof. Makrand Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.