आदिवासींचे आरक्षण व जमिनीवर गदा येऊ देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 14:26 IST2019-04-22T14:25:45+5:302019-04-22T14:26:11+5:30
नंदुरबार : मी असेपर्यंत डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आदिवासी बांधवांचे आरक्षण व त्यांच्या जमिनींवर गदा येऊ देणार नसल्याची ...

आदिवासींचे आरक्षण व जमिनीवर गदा येऊ देणार नाही
नंदुरबार : मी असेपर्यंत डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आदिवासी बांधवांचे आरक्षण व त्यांच्या जमिनींवर गदा येऊ देणार नसल्याची ग्वाही नंदुरबार येथे आयोजीत प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले़ पुढे बोलताना ते म्हणाले की, मी गरिब व सर्वसामान्य जनतेचा चौकीदार आहे़ आणि हा चौकीदार असेपर्यंत भारतीयांच्या अधिकारावर गदा येऊ देणार नाही़ सोबत मोदी यांनी नंदुरबारातील सिकलसेल, कुपोषण, गरोदर माता आदींसाठी केंद्र व राज्य सरकार व्यापक मोहिम राबवत असल्याचेही त्यांनी सांगितले़