सर्व सहा पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 13:11 IST2020-01-15T13:10:56+5:302020-01-15T13:11:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील सर्व सहा पंचायत समितीत्यांच्या सभापती पदासाठी आरक्षण जाहिर करण्यात आले़ यातील तीन पंचायत ...

Reservation for the post of Chairman of all six Panchayat Samiti has been announced | सर्व सहा पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहिर

सर्व सहा पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहिर

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील सर्व सहा पंचायत समितीत्यांच्या सभापती पदासाठी आरक्षण जाहिर करण्यात आले़ यातील तीन पंचायत समिती सभापती पदासाठी अनुसुचित जमाती महिला तर तीन ठिकाणी अनुसुचित जमाती पुरुष असे आरक्षण राहणार आहे़ जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी ही प्रक्रिया पूर्ण झाली़
अप्पर जिल्हाधिकारी दत्तात्रय बोरुडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला उपजिल्हाधिकारी धनंजय निकम यांच्यासह राजकीय प्रतिनिधी म्हणून आमदार डॉ़ विजयकुमार गावीत, माजी आमदार डॉ़ शरद गावीत, रविंद्र गिरासे, बीक़े़पाटील, शांताराम मिस्तरी, शिवराम वळवी, राजेश वसावे उपस्थित होते़
पंचायत समित्यांचा कार्यकाळ येत्या १६ जानेवारीपासून सुरु होणार आहे़ त्या पार्श्वभूमीवर ही आरक्षण सोडत काढण्यात आली़ प्रक्रियेनंतर पंचायत समितीवर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग येणार आहे़ गेल्यावेळी अक्कलकुवा, धडगाव आणि शहादा येथे सभापती पदासाठी अनुसुचित जमाती पुरुष असे आरक्षण होते यात यंदा बदल झाला आहे़ तर दुसरीकडे तळोदा, नवापुर आणि नंदुरबार येथे महिलांऐवजी पुरुष प्रतिनिधित्त्व करणार आहेत़

धडगाव-अनुसुचित जमाती (महिला)़
अक्कलकुवा- अनुसुचित जमाती (महिला)़
शहादा- अनुसुचित जमाती (महिला)़
तळोदा-अनुसुचित जमाती (पुरुष)़
नवापुर-अनुसुचित जमाती (पुरुष)़
नंदुरबार- अनुसुचित जमाती (पुरुष)़
अडीच वर्षांसाठी ही आरक्षण सोडत काढण्यात आली़ नियुक्त सभापतींच्या कार्यकाळानंतर पुन्हा आरक्षण काढले जाणार आहे़

Web Title: Reservation for the post of Chairman of all six Panchayat Samiti has been announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.