गरीबांचे आरक्षण व संरक्षण काढण्याचा डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 21:02 IST2018-10-06T21:01:53+5:302018-10-06T21:02:01+5:30
काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा : नंदुरबार व शहाद्याच्या सभेत अशोक चव्हाण यांची मोदी सरकारवर टिका

गरीबांचे आरक्षण व संरक्षण काढण्याचा डाव
नंदुरबार : घटनेने दिलेले गरिबांचे आरक्षण आणि त्यांचे संरक्षण काढणा:या मोदी व फडणवीस सरकारला येत्या निवडणुकांमध्ये त्यांची जागा दाखवा असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी नंदुरबार व शहादा येथील जाहीर सभांमधून केले. देश व राज्यातील परिवर्तनाची सुरुवात नंदुरबारातून झाली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा शनिवारी दुपारी शहादा तर सायंकाळी नंदुरबारात दाखल झाली. शहाद्यात जनता चौकात तर नंदुरबारात नाटय़गृहात जाहीर सभा घेण्यात आल्या. त्यावेळी खासदार अशोक चव्हाण बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्याचे प्रभारी एम.संदीप, माजीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात, हुसेन दलवाई, आरिफ नसीम खान, आमदार सुरुपसिंग नाईक, माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावीत, र}ाकर महाजन, भाई नगराळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी, प्रवक्ते सचिन सावंत, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, शोभा बच्छाव, आमदार अॅड.के.सी.पाडवी, आमदार डॉ.सुधीर तांबे, माजी आमदार अॅड.पद्माकर वळवी, नगराध्यक्षा र}ा रघुवंशी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना खासदार अशोक चव्हाण म्हणाले, मोदी व फडणवीस सरकारने निवडणुकांमध्ये दिलेले सर्वच आश्वासने हवेत विरले. लोकांमध्ये निराशा आली आहे. दिलेल्या एकाही आश्वासनाची पुर्तता झालेली नाही. चुनावी जुमला म्हणून या आश्वासनांकडे आम्ही पहात असल्याचे भाजप नेते सांगतात. काँग्रेस निवडणुकांमध्ये जाहीरनामा नाही तर वचननामा देत असते. ते पाच वर्षात पुर्ण कसे होतील याची चिंता पक्षाला असते. परंतु भाजपचे मोदी व त्यांचे नेते फेकूपणात एक नंबर असल्याचे ते म्हणाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पहिल्यांदा खरे बोलले. सत्ताच येणार नाही म्हणून भरमसाठ आश्वासने देत सुटलो आता ती पुर्ण करण्यासाठी नाकीनऊ येत असल्याचे त्यांनी कबुली देत सरकारलाच उघडे पाडल्याचे खासदार चव्हाण यांनी सांगितले. काँग्रेसने आधारचा वेगळा उद्देश ठेवून ते आणले. परंतु या सरकारने प्रत्येकच गोष्टीत आधार घुसविले. परिणामी सुप्रिम कोर्टाला फटकारे मारावे लागल्यावर आता ते शांत झाल्याचे चव्हाण म्हणाले. मोदी सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालत आहे. प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप केला जात आहे. घटना बदलण्याचे षडयंत्र रचले जात आहे. संविधान जाळण्यार्पयत त्यांची मजल जात आहे. प्रत्येक क्षेत्रात संघाचे लोकं घातले जात आहेत. हे सरकार देशाचे हिताचे नाही त्यामुळे परिवर्तन घडविण्याची ही वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले. या परिवर्तनाची सुरुवात नंदुरबारातून करून देश आणि राज्याला एक वेगळा संदेश द्यावा असे आवाहन त्यांनी केले.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले, गेल्या साडेचार वर्षातील जनतेच्या मनातील आक्रोश या जनआक्रोश या माध्यमातून बाहेर निघत आहे. फसव्या घोषणा करण्यात माहीर असलेल्या मोदी व फडणवीस सरकारने कजर्माफीच्या नावाखाली जनतेला चुना लावला. कजर्माफी द्यायचीच नव्हती त्यामुळे 20 पेक्षा अधीक जीआर काढून शेतक:यांना मेटाकुटीस आणून हाती काहीच दिले नाही. अंबानी, अदाणी, रामदेवबाबा यांची झोळी भरण्याचे काम तेवढे या सरकारांनी केले असल्याचा आरोप त्यांनी केला. नोटाबंदी हा मनी लाँड्रीगचा प्रकार होता. रघुराम राजन, पनगडीया, सुब्रमण्यम स्वामी हे जागतिक किर्तीचे व आर्थिक क्षेत्रात नावाजलेली लोकं यांना सोडून गेली. सर्वच आर्थिक आघाडींवर हे सरकार अपयशी ठरल्याचेही त्यांनी सांगितले.
आमदार बाळासाहेब थोरात यांनी जिल्हा नेहमीच काँग्रेसच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिला आहे. येत्या काळातही जनता पक्षाशी एकनिष्ठ राहून केवळ घोषणाबाजी करणा:या भाजला थारा देणार नसल्याचे सांगितले.
हुसेन दलवाई, आरीफ नसीम खान, नवाब मलीक, सचीन सावंत यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आपल्या आगळ्या शैलीने कार्यकत्र्यामध्ये जोश निर्माण केला. आगामी निवडणुकांमध्ये परिवर्तनाची सुरुवात नंदुरबारात होईल अशी ग्वाही काँग्रेस नेत्यांना दिली.