सैतान्याच्या शेतक-याची मुख्यमंत्र्यांकडे याचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 13:05 IST2018-04-16T13:05:34+5:302018-04-16T13:05:34+5:30

सैतान्याच्या शेतक-याची मुख्यमंत्र्यांकडे याचना
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 16 : वडिलांनी शेती सुधारसाठी बँकेकडून घेतलेल्या साडेपाच लाख रुपयांचा कर्जाचा डोंगर एकीकडे, दुसरीकडे कजर्मुक्ती अभियानात लाभापासून वंचीत. वडिलांचे दुर्धर आजारात झालेला मृत्यू आणि त्यामुळे पुन्हा झालेले खाजगी कर्ज यामुळे आर्थिक स्थिती खालावलेल्या युवा शेतक:याने मुख्यमंत्र्यांकडे मदतीची याचना केली आहे.
सैताणे, ता.नंदुरबार येथील राजेंद्र शांतिलाल बुवा यांनी मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांना याबाबत पत्र पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, वडिल शांतिलाल महारू गोसावी (बुवा) यांनी 2012 मध्ये नंदुरबारातील राष्ट्रीयकृत बँकेकडून शेती सुधारसाठी साडेपाच लाख रुपये कर्ज घेतले होते. परंतु त्यानंतर शांतीलाल पाटील यांना दुर्धर आजार झाला. त्यावरील उपचारासाठी त्यांना पुन्हा कर्ज काढावे लागले. परंतु आजार न सुधारल्याने त्यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे बँकेचा कर्जाचा वाढता डोंगर, शेतातील नापिकी यामुळे कुटूंबियांवर मोठे कर्ज झाले. प}ी, आई, व दोन लहान मुलांचा प्रपंच चालवितांना मोठी कसरत करावी लागत असल्याचे त्यांचे म्हणने आहे. शासनाने नुकतीच कजर्मुक्तीची योजना अंमलात आणली, परंतु त्यात बुवा कुटूंबियांना काहीही लाभ झाला नाही. यामुळे हताश झालेले राजेंद्र शांतिलाल बुवा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र वजा निवेदन पाठविले आहे. एकतर कजर्मुक्तीचा लाभ द्या, किंवा आत्महत्येस परवाणगी द्यावी अशी मागणी त्यांनी या पत्रात केली आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून त्यांच्या मागणीकडे लक्ष दिले नसल्याचे राजेंद्र बुवा यांचे म्हणने आहे.