जिल्ह्यातील नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 21:47 IST2020-07-14T21:47:07+5:302020-07-14T21:47:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील आणखी नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ सोमवारी प्राप्त अहवालानुसार नंदुरबार शहरात सहा ...

जिल्ह्यातील नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील आणखी नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ सोमवारी प्राप्त अहवालानुसार नंदुरबार शहरात सहा तर शहादा शहरात दोघांचा अहवाल पॉझिव्हि आला आहे़
नऊ जणांच्या अहवालामुळे कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या ही २६९ झाली आहे़ रविवारी नंदुरबार शहरात आंबेडकर चौकातील ७५ वर्षीय वृद्ध तर चौधरी गल्लीतील ८५ वर्षीय वृद्ध महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला आहे़ दोघांचे अहवाल मृत्यूनंतर पॉझिटिव्ह आले होते़ सोमवारी आढळून आलेल्या बाधित रुग्णात नंदुरबार शहरातील तलाठी कॉलनीतील ३७ वर्षीय पुरूष, गवळीवाडा येथील ३९ वर्षीय महिला, रघुवंशी नगर-२३ वर्षीय युवक, वर्धमान नगर-४२ वर्षीय पुरूष, विमल हाऊसिंग मधील २७ वर्षीय पुरूष, भाट गल्ली- ४२ वर्षीय पुरूष आणि चौधरी गल्लीतील २२ वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे़
तसेच आजच्या अहवालात शहादा येथील दादावाडी भागातील ७० आणि गरीब नवाज कॉलनीतील ७० वर्षीय पुरूषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे़ एकीकडे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना सोमवारी १७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे़ यात तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याचा समावेश आहे़ या रुग्णांना सायंकाळपर्यंत डिस्चार्ज देण्याचे कामही सुरू होते़ नव्याने आढळून आलेल्या ९ पैकी एक रुग्ण हे शहरातील नामवंत स्त्रीरोग तज्ञ असल्याची माहिती समोर येत आहे़ सोमवारी पॉझिटिव्ह आलेले सर्व अहवाल जिल्हा रुग्णालयात अँटीजेन या रॅपिड आणि ट्रूनेट मशिनवर पडताळणी करुन घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़