नंदुरबार जिल्ह्यात २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 12:38 IST2020-07-07T22:20:54+5:302020-07-08T12:38:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत़ मंगळवारी सकाळी पाच तर रात्री २१ जण आढळून ...

नंदुरबार जिल्ह्यात २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत़ मंगळवारी सकाळी पाच तर रात्री २१ जण आढळून आल्याने कोरोनाबाधितांचा आकडा एकाच दिवसात द्विशतक पार करुन गेला आहे़
धुळे येथील जिल्हा रुग्णालयात ९३ जणांचे स्वॅब रिपोर्ट तपासणीसाठी पाठवण्यात आले होते़ यातील २१ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत़ यात १६ रुग्ण हे नंदुरबार शहर, तीन जिल्हा सामान्य रुग्णालय तर शहादा आणि नवापूर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे़ जिल्ह्यात कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या आता २१६ झाली आहे नंदुरबार शहरातील बागवान गल्ली, गांधीनगर, चौधरी गल्ली, नागाई नगर, प्राथमिक आरोग्य केंद्र लहान शहादा ता.नंदुरबार, भाट गल्ली, आर्शिवाद कॉलनी, धर्मराज नगर, तालुका वैद्यकीय कार्यालय पंचायत समिती, ज्ञानदीप सोसायटी धुळे रोड, हुडको कॉलनी येथे प्रत्येकी एक तर सहारा टाऊन व देसाईपुरा येथे प्रत्येकी दोन अशा १६ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे़ शहादा तालुक्यातील मोहिदा ता़ शहादा व नवापूरातील जनता पार्क येथेही प्रत्येकी एक रुग्ण आहे़
दरम्यान मंगळवारी दुपरी प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार अक्कलकुवा येथील पोलीस लाईनीतील ७५ वर्षीय महिला, १६ वर्षीय युवक, गेंदामाळ चिखली ता़ धडगाव येथील ४२ वर्षीय पुरुष तर नंदुरबार शहरातील हुडको कॉलनीतील ३२ आणि राजीव गांधी नगरातील ३८ वर्षीय पुरूषाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे़ या सर्वांना जिल्हा रुग्णालयाच्या कोविड कक्षात दाखल करण्यात आले आहे़