कोरोनाबाधित रुग्णाचे रिपोर्ट सोशल मिडियात दिल्याने गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 12:45 IST2020-04-01T12:45:09+5:302020-04-01T12:45:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना रुग्णाची ओळख सोशल मिडियातून जाहिर करत त्याच्या मृत्यूचे रिपोर्ट व्हायरल केल्याप्रकरणी नंदुरबारातील दोघांवर ...

Reporting a coronet-infected patient on social media | कोरोनाबाधित रुग्णाचे रिपोर्ट सोशल मिडियात दिल्याने गुन्हा

कोरोनाबाधित रुग्णाचे रिपोर्ट सोशल मिडियात दिल्याने गुन्हा


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोना रुग्णाची ओळख सोशल मिडियातून जाहिर करत त्याच्या मृत्यूचे रिपोर्ट व्हायरल केल्याप्रकरणी नंदुरबारातील दोघांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे़ दोघेही लक्ष्मीनारायण नगर परिवार नाम व्हॉटस अ‍ॅप ग्रुपचे अ‍ॅडमिन असल्याची माहिती आहे़
आऱएल़पाटील व कामनाथ (पूर्ण नाव माहित नाही) या दोघांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे़ २८ मार्च रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास लक्ष्मीनारायण नगर परिवार नामक सोशल मिडिया ग्रुपमध्ये जळगाव येथील कोरोनाबाधित रुग्ण व त्याच्या नातेवाईकांची परवानगी न घेता रुग्णाचे वैद्यकीय अहवाल व्हायरल करण्यात आले होते़ ही माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर त्यांनी तपास केल्यास आऱएल़पाटील व कामनाथ नामक व्यक्तीच्या मोबाईलमधून ती व्हायरल करण्यात आल्याचे तपासाअंती समजून आले़ यातून कोरोना विषाणू बाबत समाजात गैरमसज निर्माण झाली़ याबाबत पोलीस शिपाई शैलेंद्र दंगल माळी यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन दोघा संशयितांविरोधात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथरोग प्रतिबंधात्मक कायद व माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६चे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर करत असून पोलीसांकडून इतरही गु्रप्सवरील माहिती तपासणी सुरु आहे़

Web Title: Reporting a coronet-infected patient on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.