बर्ड फ्लू निवारणाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:35 IST2021-03-01T04:35:10+5:302021-03-01T04:35:10+5:30

देशातील सर्वात मोठे किलिंग ऑपरेशन नवापूर तालुक्यात सुरू असून, एकाच व्यावसायिकाच्या जर्मन तंत्रज्ञानाचे अत्याधुनिक दहा कुक्कुटशेडमधील तब्बल सव्वा ...

The report of the staff working on bird flu prevention is negative | बर्ड फ्लू निवारणाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अहवाल निगेटिव्ह

बर्ड फ्लू निवारणाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अहवाल निगेटिव्ह

देशातील सर्वात मोठे किलिंग ऑपरेशन नवापूर तालुक्यात सुरू असून, एकाच व्यावसायिकाच्या जर्मन तंत्रज्ञानाचे अत्याधुनिक दहा कुक्कुटशेडमधील तब्बल सव्वा दोन लाख कोंबड्या नष्ट करण्यात येत आहेत. यात सलाम बलेसरिया या व्यवसायिकाचे तब्बल १० कोटींचे नुकसान होणार आहे. पहिल्या दिवशी ४४ हजार ९०२ पक्षी, तर दुसऱ्या दिवशी ३९ हजार ३११ कुकुट पक्षी असे दोन दिवसात ८४ हजार २१३ कुक्कुट पक्षी पशुसंवर्धनच्या २० पथकांमार्फत नष्ट करण्यात आले आहे.

उन्हाळ्याचे दिवस असल्याने पीपीई कीट घालून किलिंग ऑपरेशन करणाऱ्या पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांना घामाचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांना मळमळ, उलटी व प्रकृतीत बिघाड होण्याचे प्रमाण वाढले, यासाठी आरोग्य विभागाचे डाॅक्टर व आरोग्य पथकामार्फत तत्काळ उपचार केला जात आहे.

शोली पोल्ट्रीतील उर्वरित दोन दिवसात १ लाख ५२ हजार ७८ कुकुट पक्षी व ३० लाख अंडी नष्ट करण्यात येणार आहेत. नवापूर तालुक्यात आतापर्यंत ३० पोल्ट्रीतून सात लाखांवर कुक्कुट पक्षी व २७ लाख अंडी नष्ट करण्यात आली आहेत. बर्ड फ्लू होऊ नये, यासाठी नवापूर तालुक्यात पुन्हा उपाययोजना करणे गरजेचे आहे.

१० पैकी एकाच शेड मध्ये बर्ड फ्लू

शोले पोल्ट्रीत कुक्कुट पक्ष्यांच्या एकूण दहा शेड आहेत. त्यातील एका अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या पन्नास हजार क्षमतेचा शेडचा बर्ड फ्लू रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. ३८ हजार कुक्कुट पक्षी असलेल्या केवळ एकाच शेडमध्ये बर्डफ्लूची लागण झाली आहे. प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली उर्वरित नऊ शेडमध्ये कुक्कुट पक्षी नष्ट करण्याचे काम पशुसंवर्धन विभाग करीत आहे.

कोट...

आमच्या पोल्ट्रीतून दीड ते दोन लाख अंडी दररोज पाठवली जात होती. एका अंड्याला पाच रुपये भाव मिळत होता. बर्ड फ्लूमुळे ३० लाख अंडी नष्ट होणार आहेत. साधारण पक्षी, अंडी, पशुखाद्य मिळून १० कोटीचे नुकसान आहे. नुकसान भरपाई लवकर मिळावी, दोन दिवसात सर्व पक्षी व अंडी नष्ट करण्यात येणार आहेत.

अतिक बलेसरिया, संचालक, शोली पोल्ट्री, नवापूर

Web Title: The report of the staff working on bird flu prevention is negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.