आयसोलेशनधील एकाचा रिपोर्ट दुसऱ्यांदाही पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 12:06 IST2020-05-06T12:06:14+5:302020-05-06T12:06:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या १९ कोरोनाबाधितांपैकी एकाचा स्वॅब रिपोर्ट दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आला आहे़ हा ...

The report of one in isolation is also positive for the second time | आयसोलेशनधील एकाचा रिपोर्ट दुसऱ्यांदाही पॉझिटिव्ह

आयसोलेशनधील एकाचा रिपोर्ट दुसऱ्यांदाही पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या १९ कोरोनाबाधितांपैकी एकाचा स्वॅब रिपोर्ट दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आला आहे़ हा रुग्ण नंदुरबार येथील असल्याची माहिती आहे़ आयसोलेशन वॉर्डात दाखल असलेल्या बाधिताची प्रकृती ठीक असल्याची माहिती देण्यात आली आहे़
शहादा येथे ९, नंदुरबार सहा तर अक्कलकुवा चौघांना कोरोनाची बाधा झाल्याचे यापूर्वी निष्पन्न झाले आहे़ त्यांच्या संपर्कातील व्यक्तींसह कोरोनासारखी लक्षणे दिसणाºया एकूण ६५६ जणांचे स्वॅब रिपोर्ट आजअखेर तपासण्यात आले आहेत़ यातील ५५२ रिपोर्ट हे निगेटीव्ह आले होते़ १९ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते़ यातील एकाचा मृत्यू झाला आहे़ अद्याप १०७ नमुन्यांची प्रतिक्षा आहे़ या नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे़ आतापर्यंत घेण्यात आलेल्या अहवालांमध्ये रुग्णालयात काम करणाºया ११२ वैद्यकीय अधिकारी, परिचारिक, परिचर, सफाई कामगार यांचेही स्वॅब नमुने घेण्यात आले होते हे सर्व नमुने निगेटिव्ह आले असल्याची माहिती देण्यात आली आहे़
सध्या आयसोलेशन वॉर्डात २१ जण दाखल असून यातील ९ जणांचे स्वॅब हे पाठवण्यात आले आहेत़ सर्वच जणांची प्रकृती ठिक असून आजाराची वाढ होण्यापूर्वीच क्वारंटाईन करण्यात आल्याने धोका टळल्याची माहिती देण्यात आली आहे़ जिल्हा रुग्णालयात तब्बल आठ वैद्यकीय पथकं दिवसभरात शिफ्ट ड्यूटी करुन क्वारंटाईन करण्यात आलेल्या रुग्णांवर उपचार करुन त्यांची देखभाल करत आहेत़

दरम्यान दुसºयांदा पॉझिटिव्ह आलेला रुग्ण हा नंदुरबारातील प्रथम रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे़ यासोबत शहादा येथील संपर्कात आलेल्या एका डॉक्टरच्या स्वॅब रिपोर्टचा अहवाल निर्विवाद म्हणून पाठवण्यात आला होता़ या अहवालाची पडताळणी केल्यानंतर संबधित डॉक्टरचा अहवाल हा नेगेटिव्ह असल्याची माहिती देण्यात आली होती़ गेल्या एक महिन्यातील निर्विवाद असलेला हा एकमेव रिपोर्ट होता़ मंगळवारी ३९ जणांच्या स्वॅबचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत़ यात नटावद येथील व्यक्तीच्या कुटूंबातील तिघांचा समावेश आहे़

Web Title: The report of one in isolation is also positive for the second time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.