अपर अधीक्षक व दोन उपअधीक्षकांची बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 15:45 IST2020-10-02T15:45:44+5:302020-10-02T15:45:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील प्रमुख तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून त्यांच्या जागी मात्र कुणाचीही नियुक्ती झाली ...

अपर अधीक्षक व दोन उपअधीक्षकांची बदल
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील प्रमुख तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून त्यांच्या जागी मात्र कुणाचीही नियुक्ती झाली नाही.
अपर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक गृह व अक्कलकुवा विभाग यांची बदली झाली आहे. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांची याच पदावर जळगाव येथे बदली झाली आहे. त्यांना तातडीने पदभार स्विकारण्याबाबत सुचीत करण्यात आले आहे. त्यांच्या जागी मात्र कुणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही.
गृह शाखेचे पोलीस उपअधीक्षक सिताराम गायकवाड यांची देखील बदली करण्यात आली आहे. ते आता नाशिक शहर येथे सहायक आयुक्तपदी पदभार घेणार आहेत. त्यांच्या जागेवर देखील कुणीही नियुक्त झालेले नाही. अक्कलकुवा विभागाचे पोलीस उपअधीक्षक विक्रम कदम यांची पंढरपूर येथे उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
यापूर्वीच अर्थात गेल्या महिन्यात नंदुरबारचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार हे सेवानिवृत्त झाले आहेत. ते पद देखील अद्याप रिक्तच आहे.
आजच्या स्थितीत एक अपर पोलीस अधीक्षक व तीन उपविभागीय पोलीस अधिकारी/ उपअधीक्षक पदे रिक्त आहेत. या रिक्त जागांवर कुणाची नियुक्ती आणि कधी होते याकडे आता लक्ष लागून आहे.