बॅरिकेटस काढून वाहनांची सर्रास ये-जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 12:23 IST2020-04-30T12:23:46+5:302020-04-30T12:23:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरात कोरोना विषाणू संक्रमित रूग्णांची संख्या नऊ झाली आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक संख्या आहे. या ...

Remove barricades and move vehicles | बॅरिकेटस काढून वाहनांची सर्रास ये-जा

बॅरिकेटस काढून वाहनांची सर्रास ये-जा

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरात कोरोना विषाणू संक्रमित रूग्णांची संख्या नऊ झाली आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक संख्या आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील पालिका प्रशासनाने कंटेनमेंट झोनमधील रस्त्यावर लावलेले बॅरेकेटिंग काढून काही नागरिक मनाई असतानाही खुलेआम रस्त्याचा वापर करीत आहे. शहरात संकटाचे थैमान जारी असतानाही त्या तुलनेत नागरिक तेवढे गंभीर नाही व प्रशासनही कठोर कारवाई करीत नाही असा आरोप सुज्ञ नागरिकांनी केला आहे.
प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांच्या आदेशान्वये प्रभाग क्रमांक चार व सात हे कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या भागातील सर्व प्रतिष्ठाने बंद करण्याचे तसेच रस्त्यावर बॅरेकेटिंग करण्याचे आदेश आहे. त्यानुसार पोलीस व पालिका प्रशासनाने बहुसंख्य भागात बॅरिकेटिंग पूर्ण केली आहे. मात्र शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांनी मुख्य रस्ते बंद असल्याने शहरातील चोरट्या रस्त्याचा शोध घेऊन नवीन वसाहतीतून मार्गक्रमन सुरू ठेवले होते. याबाबत अनेक नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रार केली आहे.
याच कंटेनमेंट झोनमध्ये पटेल रेसिडेन्सी चौकात प्रशासनामार्फत बॅरेकेटिंग करण्यात आलेले असताना बुधवारी दुपारच्या सुमारास याठिकाणी प्रशासनाचा कुठलाही अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्याचे पाहून अनेक वाहनचालकांनी बॅरेकेटिंग सोडून रस्ता खुला करीत आपली वाहने काढण्याचा पराक्रम केला. वाहनचालकांच्या या कृतीबाबत याच भागात राहणाºया नागरिकांनी जाब विचारला असता वाहनचालकांनी अरेरावीची भाषा वापरली. अनेक नागरिकांनी याबाबत प्रशासनाला तक्रारही केल्या. मात्र तरीही बराच वेळ या रस्त्यावरून वाहतूक सुरू होती.
कोरोनाचे संकट दिवसेंदिवस तीव्र होत असताना शासकीय नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याऐवजी काही नागरिकांकडून त्याची पायमल्ली करण्यात येत आहे. भविष्यात याचा त्रास सर्वांना सोसावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा परिस्थितीत शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Remove barricades and move vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.