शस्त्रक्रिया गृहातील नागोबाची सर्पमित्राकडून सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 12:27 IST2020-06-25T12:27:10+5:302020-06-25T12:27:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया गृहात विषारी नागाने मध्यरात्री ठाण मांडल्याने महिलेचे सिझर लांबले. परंतु सर्पमित्र ...

शस्त्रक्रिया गृहातील नागोबाची सर्पमित्राकडून सुटका
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया गृहात विषारी नागाने मध्यरात्री ठाण मांडल्याने महिलेचे सिझर लांबले. परंतु सर्पमित्र विशाल नागरे यांनी तातडीने धाव घेत नाग पकडून महिलेच्या सिझरचा मार्ग मोकळा केला.
दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री जिल्हा रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया गृहात एका गर्भवती महिलेचे सिझर करण्यात येणार होते. त्यासाठी शस्त्रक्रिया गृहात आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली. महिलेला शस्त्रक्रियेच्या बेडवर आणण्यात आले. त्याचवेळी तेथील परिचरला कोपऱ्यात नाग असल्याचे दिसून आले. त्यामुळे सर्वांची धावपळ उडाली. विषारी नाग असल्याने त्याला तेथून काढण्याची कुणाचीही हिंमत होत नव्हती. त्यामुळे सर्पमित्र विशाल नागरे यांना फोन करण्यात आला. त्यांना एवढ्या रात्री जाण्यास परिवाारातील सदस्यांनी विरोध केला. परंतु महिलेचे सिझर होणे गरजेचे असल्यामुळे नागरे यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी विषारी नागाला अलगद पकडून जंगलात सोडले. त्यामुळे लागलीच महिलेच्या प्रसुतीचा मार्ग मोकळा झाला. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे कौतूक केले.
घाणीचे साम्राज्य