नोव्हेंबरमध्ये अंतिम याद्यांचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 12:46 IST2019-10-31T12:46:07+5:302019-10-31T12:46:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रक्रियेंतर्गत 11 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार याद्यांचे प्रकाशन ...

Release of final lists in November | नोव्हेंबरमध्ये अंतिम याद्यांचे प्रकाशन

नोव्हेंबरमध्ये अंतिम याद्यांचे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रक्रियेंतर्गत 11 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार याद्यांचे प्रकाशन करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले असून त्यानुसार कामकाजाला प्रारंभ झाला आह़े याद्या प्रकाशित झाल्यानंतर तात्काळ निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आह़े 
राज्यातील पाच जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची तयारी राज्य निवडणूक आयोगाकडून सुरु करण्यात आली आह़े बुधवारी नंदुरबार जिल्हा प्रशासनाने 56 गट आणि 112 गण यांच्यासाठी विभाजित केलेल्या मतदार याद्या आयोगाकडे सादर केल्या होत्या़ त्यावर निर्णय देत 11 नोव्हेंबर रोजी याद्या अंतीम करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत़ यांतर्गत 2 नोव्हेंबरपासून याद्यांवर घेतलेल्या हरकतींवर कारवाई सुरु होणार आह़े 11 रोजी त्या-त्या तालुका व ग्रामपंचायत स्तरावर अंतिम याद्या प्रकाशित करण्याची कारवाई पूर्ण करण्यात येणार आह़े याद्या प्रकाशित होण्याच्या दुस:या दिवशी जिल्ह्यात आचारसंहिता लागून निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े नंदुरबार जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीनंतर तात्काळ जिल्हा परिषद निवडणूकांमुळे शासकीय कर्मचारी व पोलीस दलाची कामे वाढणार असल्याने त्यांच्याकडून तयारी सुरु करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े 
येत्या महिन्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकांमुळे ग्रामीण भागातील राजकारण पुन्हा तापणार आह़े निवडणूका पार पडल्यानंतर सहा महिन्याच्या कालावधीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये पदाधिकारी आणि सदस्यांचा वावर पुन्हा सुरु होणार आह़े 
 

Web Title: Release of final lists in November

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.